जामोदात शिवजयंती निमित्त महाशोभायात्रा उत्साहात व शांततेत संपन्न...


 
जामोदात शिवजयंती निमित्त महाशोभायात्रा उत्साहात व शांततेत संपन्न...

जळगाव जामोद प्रतिनिधी:-

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथी नुसार मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त दि १८ मार्च रोजी शिवसेना शाखा जामोदच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार भव्य मिरवणूक काढून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली स्थानिक काँटन मार्केट मधून सुंदर सजविलेल्या ट्रॅक्टर मधून महाराजांच्या महाशोभायात्रेस सायंकाळी ४ वाजता प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विधीवत पुजा अर्चा करून सुरुवात करण्यात आली होती यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी जामोद येथे शिवजयंती मिरवणूकी दरम्यान भेट देऊन मिरवणूक मार्गाची पहाणी केली व मिरवणुकीदरम्यान अनुचित प्रकार घडु नये यासाठीं तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता..सदर मिरवणुकीमध्ये सर्वस्वी शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख दत्ताभाऊ पाटील, यांच्यासह. राजकीय पक्षाचे लोक व शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी विविध जातीधर्मातील मान्यवर तसेच सर्व शिवसैनिकांसह कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते गावातील मुख्य मार्गाने मिरवणूक जात असतांना गावात ठिक ठिकाणी फुलांची उधळण करीत तर महिलांनी रस्त्यांवर रांगोळ्या काढून आरती ओवाळून मिरवणूकीचे स्वागत केले सदर मिरवणुक गावातील मुख्य मार्गाने गेल्या नंतर रात्री ८ वाजता काँटन मार्केट जवळ समारोप करण्यात आला अप्पर पोलीस अधिक्षक श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जामोद पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्रीकांत निचळ यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता हे विशेष...


Previous Post Next Post