मुख्य औषध निर्माण अधिकारी विलास खवने यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार....


 
मुख्य औषध निर्माण अधिकारी विलास खवने यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार....

जळगाव जामोद प्रतिनिधी...

जामोद प्राथमिक आरोग्य केंद्रात अविरत पणे सेवा देणाऱ्या दोन आरोग्य कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीपर कृतज्ञता गौरव सोहळा दि. १२ मार्च रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र जामोद येथे आयोजित करण्यात आला होता जामोद प्राथमिक आरोग्य केंद्रांचे मुख्य औषध निर्माण अधिकारी विलास खवने व सफाई कामगार शे.सलीम शे.रहीम यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला...यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन मुख्य औषध निर्माण अधिकारी विलास खवने यांचा सपत्नीक स्वागत व सत्कार करण्यात आला त्यानंतर सफाई कामगार शेख .सलिम शेख रहीम यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत म्हणून तालुका आरोग्य अधिकारी उज्वला पाटील, तसेच वैद्यकीय अधिकारी डाँ कदम, डाँ प्राजक्ता देशमुख, डाँ येनकर यांच्या सह जामोद प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post Next Post