बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
उन्हाळ्याचे दिवस लक्ष्यात घेता पक्ष्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती रोखण्यासाठी जंगलात जाऊन भोपळे आणुन त्यांना कमंडलू आकार देऊन जल पात्राची निर्मिती करून आज दिं २५ मार्च २०२५ मंगळवार रोजी वाटप करण्यात आले पशु पक्षी ही जंगलाची शान व गौरव आहे मानवाच्या प्रमाणे त्यांना ही जगण्याचा अधिकार आहे रखरखत्या उन्हात सावली साठी व चिमुटभर दाण्यासाठी चिमणी व पक्षी यांची भटकंती दिसून येते मात्र वाढते प्रदुषणा मुळे चिमणी व पक्षी संकटात आले आहे या लहानश्या जिवाला वाचवण्यासाठी जागतिक पातळीवर २० मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो सध्यस्थितीत चिमणी काळाच्या ओघात लुप्त होण्याच्या वाटेवर आहे त्यांच्या विषयी समाजात जागृती निर्माण व्हावी त्यांचे योग्य संवर्धन व्हावे या करीता शहरातील सामाजिक संस्था श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाचे वतीने दरवर्षी जल पात्र वाटप केले जाते मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास ऊर्फ मुन्नाभाऊ शर्मा व त्यांचे सहकारी हे मागिल २५ वर्षा पासून तलाव रोड. घाटपुरी रोड. शेगाव रोड आदी ठिकाणी जाऊन जंगली दुधी भोपळे आणुन त्यांना सुकवतात व नंतर त्यांना कमंडलू आकार देऊन जल पात्राची निर्मिती करतात हे कमंडलू ( कुंड्या ) पर्यावरण पूरक व नैसर्गिक असुन पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी योग्य ठरत आहे विषेश म्हणजे या कुंड्या वाटप ही मंडळाच्या वतीने ज्या ठिकाणी पक्ष्यांची संख्या जास्त असेल अश्या ठिकाणी वाटप करण्यात येतात आज दिं २५-३-२०२५ मंगळवार रोजी वाटप करण्यात आल्या व जनावरांना पाणी पिण्यासाठी हौद लावण्यात आला या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत विश्व हिंदू परिषद जिल्हा अध्यक्ष राजेशजी झापर्डे. समाज सेवक नरेंद्र जी मावळे. सुभाषराव शेळके. प्रविण थोरात. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा. विनोद सुकाळे. दिलीप झापर्डे. अरूण कडवकर. लालाजी सांगळे.मनोज सुळोकार.आशा अंधारे. सुशिला आवलकर.शकुंतला ढवळे. मंगला बावस्कर.संगिता वाघोळे.जयश्री झापर्डे. जया सुकाळे. व परीसरातील नागरिकांची उपस्थिती होती.अशी माहिती श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने देण्यात आली.
