संस्कारक्षम व चारित्र्यसंपन्न शिक्षण काळाची गरज:- प्रा.राजेश पाटिल ताले.. (विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रम,हिवरखेड ता.तेल्हारा)


 संस्कारक्षम व चारित्र्यसंपन्न शिक्षण काळाची गरज:- प्रा.राजेश पाटिल ताले..

(विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रम,हिवरखेड ता.तेल्हारा)

प्रशांत भोपळे/हिवरखेड...

पीएम श्री जिल्हा परिषद शाळा(मुले) हिवरखेड ता.तेल्हारा येथे पीएम श्री योजनेअंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाकरिता प्रमुख मार्गदर्शक म्हणून जेसीआय इंडिया द्वारा आऊटस्टँडिंग यंग पर्सन ऑफ द इंडिया अवॉर्ड:-२०२४ चे विजेते,स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष, युवाव्याख्याते प्रा.राजेश पाटिल ताले उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.पोके सर,प्रमुख अतिथी म्हणुन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष इंगळे,हिवरखेड चे पोलीस पाटील प्रकाश गावंडे,तेल्हारा तालुक्यातील आरोग्य अधिकारी गावातील प्रतिष्ठित नागरिक व्यासपीठावर उपस्थित होते.

आईवडील विद्यार्थ्यांचे पहिले गुरू असतात त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिक व्यक्तिमत्वावर आईवडिलांची छाप असते,त्यामुळे आईवडिलांनी विद्यार्थ्यांवर वयाच्या १४ व्या वर्षापर्यंत विशेष संस्कार करावेत जेणेकरून विद्यार्थ्यांचा पाया शालेय जीवनातच भक्कम होईल असे प्रा.राजेश पाटिल यांनी सांगितले.प्रा.राजेश पाटिल ताले यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आणि राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय पातळीवर अकोला जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल शाळेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रा.राजेश पाटिल ताले यांना सन्मानित करण्यात आले.स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन विविध व्याख्याने,कार्यशाळा आणि शिबिरांमधून करीत असलेले कार्य सृजनशील समाजनिर्मितीमध्ये मोलाची भूमिका पार पाडत आहे. तसेच गाव तिथं वाचनालय,वाचनालय चळवळ हे ग्रुपचे कार्य समाजात विचार आणि संस्कार पेरण्याचे नाविन्यपूर्ण कार्य करीत आहे असे प्रतिपादन मुख्याध्यापक पोके सर यांनी केले.

Previous Post Next Post