खासदार बळवंत वानखेडे यांच्या हस्ते बोराळा येथे मच्छर दानी वाटपाचे कार्यक्रम संपन्न...
राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी..
चिखलदरा तालुक्यातील बोराळा या आदिवासीबहुल दुर्गम भागात सामाजिक आर्थिक संशोधन संस्था भरत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड व खासदार बळवंतभाऊ वानखडे खासदार अमरावती लोकसभा यांच्या सहकार्याने आयोजित कीटकजन्य आजारांचे प्रतिबंध आणि मच्छरांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दीर्घकाळ टिकणाऱ्या कीटकनाशक जाळीचे १५०० वितरण खासदार बळवंतभाऊ वानखडे अमरावती लोकसभा यांच्या हस्ते टेब्रुंसोंडा जिल्हा परिषद सर्कल मधिल बोराळा येथिल आठ गावाना या जाळीचे वितरण करण्यात आले आहे. यावेळी प्रामुख्याने - दयारामजी काळे माजी सभापती जि.प. अमरावती, सहदेव बेलकर तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी चिखलदरा, किशोर झाडखंडे अध्यक्ष अनुसूचित जाती विभाग चिखलदरा काँग्रेस कमिटी , नितेश वानखडे सचिव युवक काँग्रेस महाराष्ट्र , गानुजी सावलकर अध्यक्ष आदिवासी संघटना चिखलदरा, बाबु जावकर मा.पोलीस पाटील,डॉ. अविनाश पांडे , राजीव रंजन , सरपंच व स्थानिक गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
