डिक्कर यांचा स्वाभिमानीशी संबंध नाही-जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांनी केला खुलासा...


 डिक्कर यांचा स्वाभिमानीशी संबंध नाही-जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांनी केला खुलासा...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

प्रशांत डिक्कर यांचा गेल्या विधानसभा निवडणूकीपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी कुठलाही संबंध नाही असे मत स्वाभिमानी पक्षाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांनी एका पत्राव्दारे 22 मार्च रोजी एका पत्राव्दारे स्पष्ट केले आहे.21 मार्च रोजी शेतकर्‍यांकडुन 5 लाखाची खंडणी मागीतल्याप्रकरणी शेगांव पोलीसांत प्रशांत डिक्कर यांच्या विरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भात वातावरण तापले असतांना सदरचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांचे पत्र व्हायरल झाले आहे. पाटील यांनी पुढे असेही म्हटले आहे की,स्वाभिमानी शेतकरी संघटना व राजु शेट्टी यांच्याशी प्रशांत डिक्कर यांना जोडुन स्वाभिमानी पक्षाला बदनाम करू नये. प्रशांत डिक्कर हे विधानसभा निवडणुकीपुर्वी पक्षाचे विदर्भ अध्यक्ष म्हणुन काम पाहत होते मात्र त्यांनी विधानसभा निवडणुकीत जळगांव जामोद मतदार संघातुन छत्रपती संभाजी महाराज यांच्या पक्षामध्ये प्रवेश करून जनस्वराज्य पक्षावर निवडणुक लढवली आहे. त्यामुळे कोणीही त्यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटना किंवा राजू शेट्टी साहेब यांच्याशी संबध जोडू नये. तसे केल्यास त्यांच्याविरूध्द कायदेशीर कारवाई केली जाईल असेही त्यांनी म्हटले आहे.

Previous Post Next Post