जळगाव जामोद प्रतिनिधी -
जळगाव जामोद शहर व शिवसेना पदाधिकारी यांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शांतारामभाऊ दाणे तसेच उपजिल्हाप्रमुख देविदास घोपे, तालुका प्रसिद्धी प्रमुख बाळुभाऊ पाटील,शहरप्रमुख संजय भुजबळ यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येऊन शिवकार्य शिवसैनिक सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ करून ऑनलाइन सदस्य तसेच फॉर्म चे माध्यमातून देखील सदस्य नोंदणी सुरुवात करण्यात आली तसेच यावेळी शिवसेनेत श्री.प्रकाशभाऊ घोंगटे यांचा प्रवेश जिल्हाप्रमुख यांचे हस्ते झाला. जिल्हाप्रमुखानी सर्व पदाधिकारी आणि शाखाप्रमुख, विभागप्रमुख यांना मार्गदर्शन केले .आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती या निवडणुकी संदर्भात महत्वाची चर्चा करण्यात आली तसेच शिवसेनेचे कार्य तळागाळात पोहचून सामान्य नागरिकांना मदत करण्याची सूचना दिल्या. उपतालुकाप्रमुख विठ्ठलसिंग चव्हाण, गजानन बाप्पू देशमुख किसान सेना तालुकाप्रमुख, उपशहर प्रमुख एकलव्य पाटील, समाधान पाटील, रामा पारस्कर,राजेद्रसिंग परिहार,भागवत हागे,राजू देशमुख,विलास दातीर, अंबादास धुरडे, रामदास निमकर्डे ,रामदास पाटील,प्रकाश घोगटे अंकुश वडाळे ,महेश घाटोळे व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
