बी एस पटेल महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
सातपुडा शिक्षण व ग्रामीण विकास संस्था, पळशी वैद्य द्वारा संचालित बापुमिया सिराजोद्दीन पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पिंपळगाव काळे, येथील संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय अँड. सलीम पटेल साहेब, सहसचिव श्री. रब्बानी देशमुख उपाध्यक्ष प्रा कय्युम पटेल, संचालक सिराजोद्दीन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला दिनांक ०८ मार्च २०२५ या कार्यक्रमात महिलांच्या सशक्तीकरणावर चर्चा, प्रेरणादायी भाषणे व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घाटन वाणिज्य विभागाच्या सहायक प्राध्यापिका रुपाली आंबेकर , आणि कला विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका झोया यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या भाषणात महिलांच्या योगदानाची महती सांगून त्यांना प्रोत्साहन दिले. तसेच सहाय्यक प्राध्यापक अमोल वानखडे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक करून महिला साक्ष्मीकारणाचा संदेश दिला. तसेच स.प्राध्यापक रुपाली आंबेकर यांनी आपल्या भाषणात विद्यार्थिनींना आत्मनिर्भर होण्याचा संदेश दिला.यासोबतच, विद्यार्थिनींसाठी परिसंवाद आणि प्रेरणादायी व्याख्याने आयोजित करण्यात आली. कु.अंकिता हिरळकर, कु.गायत्री ढगे, आदित्य सातव या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.महाविद्यालय प्रशासनाने सांगितले की, महिलांच्या सशक्तीकरणासाठी अशा उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन दिले जाईल. या कार्यक्रमासाठी वाणिज्य विभागाचे सा.प्राध्यापक गोपाल हिस्सल उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सा.प्राध्यापक विकास ईसोकार यांनी केले
