बी.एस. पटेल महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे वडगाव गड येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन व आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा...


 
बी.एस. पटेल महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे वडगाव गड येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन व आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

पिंपळगाव काळे येथील बापूमिया सिराजोद्दीन पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारा विशेष श्रमसंस्कार शिबिर दिनांक ०७ ते १३ मार्च २०२५ यादरम्यान दत्तग्राम वडगाव गड येथे आयोजित शिबिराचे उद्घाटन ०८ मार्च रोजी सातपुडा शिक्षण व ग्रामीण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड सलीम पटेल यांच्या मार्गदर्शनाने व संस्थेचे सहसचिव श्री. रब्बानीजी देशमुख यांच्या हस्ते तर संस्थेचे संचालक सिराजोद्दीन पटेल, पळशी वैद्यचे उपसरपंच निळूभाऊ भोपळे यांच्या उपस्थिती मध्ये करण्यात आले. तसेच आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले, शिबीरार्थी मुलींनी मनोगते व्यक्त केली, कु. सानिया नाझ पटेल हिचा नॅशनल सेमिनार कॉम्पिटिशन मध्ये तृतीय क्रमांक आल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमाचे महिलांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. शेख फराह तर मंचकावर वडगाव गड च्या सरपंच सौ. उर्मिलाताई रमेश ताकोते, उपसरपंच एकनाथजी निंबाळकर, श्री. भगवानराव ताकोते, पत्रकार श्रीधर आव्हेकर, सिराजोद्दीन बापुमिया पटेल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. संजय राजन्देकर, सौ. ताकोते मॅडम श्री. नवाज देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी शिबिरार्थिंना मार्गदर्शन केले तसेच श्री. रब्बानीजी देशमुख यांनी उद्घाटनपर भाषणात विद्यार्थ्यांना त्यांचे अनुभव सांगितले व शिबिरामध्ये चांगले कार्य करण्यासाठी प्रेरित केले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. मनोहर जांभळे यांनी शिबिरात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली. यामध्ये युथ फॉर माय भारत, युथ फॉर डिजिटल लिटरसी, घर घर संविधान, महिला दिनानिमित्त कार्यक्रम, शिव्या मुक्त अभियान यांचा समावेश आहे. महिला दिनानिमित्त शिबिरार्थी कुमारी कोमल भालतडक हिने आपले मनोगत व्यक्त केले व महिला दिनावर कविता सादर केली. सौ ताकोते मॅडम यांनी सुद्धा महिला दिना वरती प्रकाश टाकला व शिबीरार्थींना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. शेख फराह यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचे व शिबिराचे महत्त्व समजावून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिबिरार्थी सानिया नाज पटेल व तृप्ती उगले यांनी केले तर आभार प्रदर्शन कु. कोमल भालतडक हिने केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे आय. क्यू. ए. सी. समन्वयक, सर्व प्राध्यापक राष्ट्रीय सेवा योजना सहकार्यक्रम अधिकारी डॉ. निखिल अग्रवाल, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. प्राजक्ता बाठे, श्री. गजानन इंगळे, अमोल देवकर, सागर बहादरे, वैभव ताठे,व शिबिरार्थी यांचे सहकार्य लाभले.

Previous Post Next Post