उद्या जळगाव जामोद मध्ये आमदार डॉ.संजयभाऊ कुटे यांचे हस्ते गोदावरी भवनाचा लोकार्पण सोहळा...
जळगाव जामोद प्रतिनिधी:-
माजी मंत्री आमदार डॉ. संजय कुटे यांच्या विकास निधी अंतर्गत जळगांव जामोद शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या १ कोटी रुपयांच्या "गोदावरी भवन" वास्तुचा भव्य लोकार्पण सोहळा गुढीपाडव्याच्या शुभ मूहूर्तावर सायंकाळी 7 वा होत आहे.या भवनचे उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार डॉ.संजय कुटे यांचे शुभहस्ते होणार आहे.जळगांव जामोद मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार कर्मयोध्दा डॉ. संजय कुटे यांच्या विकास निधीतून जळगांव जामोद शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या गोदावरी भवनाची निर्मिती पुर्ण झालेली आहे. हिंदु सण गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गोदावरी भवनाचा भव्य लोकार्पण सोहळा आयोजीत केला आहे.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प.पुज्य गोविंदाचार्य श्रध्दाश्रम, टुनकी राहतील.तर सत्कार मूर्ती म्हणून सुधाकर जोशी जळगांव जामोद प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. तसेच अनिल मुधकर हातेकर अध्यक्ष, ब्राम्हणसभा, जळगांव जामोद यदुभाऊ जोशी अध्यक्ष, राज्य पत्रकार अधिस्वीकृती समिती, सहयोगी संपादक, लोकमत, मुंबई,अॅड. गिरीष पांडुरंग माळपांडे तालुका संघचालक, जळगांव जामोद,मिलिंदजी जोशी नगर संघचालक, जळगांव जामोद सचिन पंजाबराव देशमुख जिल्हा अध्यक्ष, भाजपा, बुलडाणा रामदास शंकरराव बंबटकार मा. नगराध्यक्ष, जळगांव जामोद आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.तरी या भव्य वास्तुच्या होणाऱ्या भव्य लोकार्पण सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन अनिल मधुकर हातेकर-संस्थापक अध्यक्ष, अभय सुधाकर जोशी-उपाध्यक्ष, निलेश ब्रिजमोहन शर्मा-कार्यकारी अध्यक्ष, विजय सुधाकरराव कुलकर्णी-कोषाध्यक्ष, राजेंद्र गाविंदराव हुपेले-सचिव, सर्व सदस्य सचिन गजाननराव जहागीरदार, सचिन श्रीधरपंत जोशी, विशाल विनायकराव भगत, स्वप्नील मधुकरराव ठाकुरव्दारे, अभिजीत सुरेशराव कुळकर्णी, सुनिल विनायकराव राय, योगेश विनोदराव माळपांडे अध्यक्ष, ब्राम्हणसभा तथा संचालक मंडळ आणि सर्व ब्राम्हण समाज बांधव, जळगांव (जा.),ब्राम्हणसभा बहुउद्देशिय संस्था, जळगांव जामोद आदींनी केले आहे.
