अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव जामोद येथे व्यक्तिमत्व विकास शिबिर संपन्न...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव जामोद येथे व्यक्तिमत्व विकास शिबिर राबवण्यात आले.गिरीष माळपांडे , सचिन उनटकर,मिलिंद जोशी, नगर अध्यक्ष. गणेश जोशी,नगर मंत्री .रितेश ढगे ,पीडीसी प्रमुख. शुभम राजपूत, स्वाध्याय मंडळ प्रमुख वेदांत व्यवहारे, SFS प्रमुख ओम उन्हाळे यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.गिरीष माळपांडे व सचिन उनटकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.नेतृत्व विकास या विषयावर प्रसिद्ध शिव चरित्रकार केशव किन्होळकर यांचे मार्गदर्शन मधून विद्यार्थ्याना शैक्षणीक व सामाजिक क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाचा उपयोग कसा करावा ती कौशले आपण विकसित कशी करावी याचे उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. आकाश निलजे सर यांनी 10 आणि 12वी नंतर विविध क्षेत्रात उपलब्ध करिअरच्या संधी विषयी मार्गदर्शन केले. समाजातील सामाजिक स्थिती जाणून घेण्या करिता आव्हान 2025 करण्यात आले. या मध्ये विद्यार्थ्यानी नगरातील उद्योग व्यवसायांना भेटी देऊन त्यांच्या कडून वैयक्तिक, सामाजिक , शैक्षणीक माहितीवर प्रश्न विचारले व नंतर त्या वर आपले अनुभव करण्यात आले. शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यामध्ये 4 ट्रूप करण्यात आले होते. काही विद्यार्थी कृषी केंद्रावर, काही मेडिकल, तर काही विद्यार्थी किराणा, लॅबोरेटरी अशा विविध ठिकाणी गेले.
