जिल्हा परिषद चे निकृष्ट दर्जाचे काम, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष,,,सरकारी कामात चोरीच्या रेतीचा वापर...


 
जिल्हा परिषद चे निकृष्ट दर्जाचे काम, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष,,,सरकारी कामात चोरीच्या रेतीचा वापर...

 राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

अमरावती जिल्ह्यामध्ये अनेक विभागाचे सार्वजनिक बांधकाम सुरू आहेत. परंतु काम व्यवस्थित सुरू आहे की नाही याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. दर्यापूर तालुक्यातील हयापुर ते बेलोरा या दोन गावांच्या मुख्य मार्गावर जिल्हा परिषद विभागामार्फत पुलाचे काम सुरू आहे. परंतु या कामात चक्क नदीपात्रातल्या माती मिश्रित चोरीच्या रेतीचा वापर होत आहे. दर्यापूर अंजनगाव तालुक्यामध्ये कोणताच रेती घाट लिलाव झाला नाही. मग या कामावर काळी रेती आली कुठून, असा प्रश्न गावकऱ्यांना पडलाय. लाखो रुपयांचे अतिशय निष्कृष्ट दर्जाचे काम होत आहे, याकडे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत.हा गावकऱ्यांचा मुख्य रस्ता आहे. हे काम कोणत्या विभागाचे व किती रुपयाचे आहे कामाचे फलक सुद्धा आढळून आले नाही. फुलाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. या रेतीची हर्रास पावती ठेकेदाराकडे आहे का, असल्यास ती रेती आणली कुठून संबंधित दर्यापूरच्या तहसीलदारांनी या कामाची पाहणी करून बोगस बांधकामची चौकशी करावी. व काम निकृष्ट दर्जाचे आढळून आल्यास संबंधित दोषींवर कारवाई करावी.

Previous Post Next Post