गर्भात एक जिवंत अन एक मृत बाळ नऊ महिने केली देखरेख, नऊ महिन्यानंतर केली सुखरूप प्रसूती...


 
गर्भात एक जिवंत अन एक मृत बाळ नऊ महिने केली देखरेख, नऊ महिन्यानंतर केली सुखरूप प्रसूती...

राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

मेळघाटच्या मोथा गावातील एका जोखमीच्या महिलेची पाचव्या महिण्यात सोनोग्राफी केल्यानंतर एक गर्भ जिवंत तर एक गर्भ मृत असल्याची माहिती डॉक्टरांना समजताच नऊ महिन्यापर्यंत महिलेवर लक्ष ठेऊन सुखरूप प्रसूती करण्याचे आरोग्य कर्मचाऱ्यांपुढे मोठे आव्हान उभे राहिले होते मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांनी हार न मानता महिलेवर नऊ महिन्यापर्यंत लक्ष केंद्रित करून ता ४ मार्च रोजी चिखलदरा येथील ग्रामीण रुग्णालयात सुखरूप प्रसूती केली आज तिचे बाळ आणि ती महिला दोघेही सुखरूप असल्याची माहिती मोथा उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ नीता नागले यांनी दिली.

               चिखलदरा तालुक्यातील सलोना प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येत असलेल्या मोथा गावातील जोखमीची माता म्हणून नोंद असलेली भाग्येश्री संजू बेलसरे या गर्भवती महिलेची पाचव्या महिण्यात सोनोग्राफी केली असता महिलेच्या पोटात एक गर्भ जिवंत तर एक गर्भ मृत असल्याचे दिसून आल्याने व दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने त्या महिलेला नऊ महिन्यापर्यंत मृत बाळाला पोटात ठेवणे आवश्यक झाले होते मात्र त्या महिलेची प्रसूती होईपर्यंत नऊ महिन्यापर्यंत सुखरूप ठेवणे आरोग्य कर्मचाऱ्यांपुढे आव्हान उभे ठाकले होते अश्यातच डॉ साजन वर्मा यांनी सदर महिलेची प्रसूती होईपर्यंत वेळोवेळी काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले त्यामुळे मोथा उपकेंद्रातील आरोग्य कर्मचारी त्या महिलेची प्रसूतीकाळात दर आठवड्यात तपासणी करत होते अश्यातच ता ४ मार्च रोजी महिलेला प्रसवकळा सुरू झाल्या याची माहिती आशा सेविका यांनी मोथा उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ नीता नागले यांना देण्यात आली डॉक्टरांनी तपासणी करून सदर महिलेला चिखलदरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले याठिकाणी कर्तव्यावर असलेले डॉ सतीश प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेविका सिंधू खानंदे व मनीषा रंगारी यांनी सायंकाळी ३ वाजून २५ मिनिटांनी सुखरूप प्रसूती केली यामध्ये महिलेने सोनोग्राफी रिपोर्ट नुसार एका जिवंत बाळासह एका मृत बाळाला जन्म दिला ज्यामध्ये जिवंत बाळाचे वजन ३ किलो २०० ग्राम होते सध्या महिला आणि तिचे बाळ सुखरूप असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली या महिलेची सुखरूप प्रसूती व्हावी यासाठी मोथा उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ निता नागले,आरोग्य सेविका हिना सौदागर,प्रविणा धाकडे आशा सेविका शेवंता शेळके यांनी वेळोवेळी लक्ष देऊन मोलाची भूमिका बजावली

Previous Post Next Post