गाडेगाव बुद्रुक येथील नागरिकांचे दारूबंदीसाठी पोलीस स्टेशनला निवेदन.. आमरण उपोषणाचा इशारा...
जळगाव जामोद प्रतिनिधी:-
जळगाव जामोद तालुक्यातील गाडेगाव बुद्रुक येथील महिला व पुरुषांनी दिनांक ४ मार्च २०२५ रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशन गाठून गावामधील अवैध धंदे तसेच दारू बंदी बाबतचे निवेदन येथील नागरिकांनी दिले.गाडेगाव बुद्रुक येथे गेल्या काही वर्षापासून सर्रासपणे अवैधरित्या दारू विक्री तसेच इतरही अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असून यापूर्वी सुद्धा जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दारूबंदी तसेच गावातील अवैध धंदे बंद करण्याकरिता निवेदन दिले होते परंतु अद्यापही याबाबत कोणतीच कारवाई झाली नाही. गावातील महिलांना सर्रासपणे मद्यपीकडून शिवीगाळ करण्यात येते, तसेच या मद्यपीकडून त्यांच्या घरच्या महिलांना दररोज मारठोक केल्या जाते तसेच दारू पिणाऱ्या लोकांकडून जाणाऱ्या येणाऱ्या महिलांची छेडछाड तसेच मोठ्या प्रमाणात वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे येथील महिला व पुरुषांनी ग्रामपंचायत ठरावासह जळगाव जामोद पोलीस स्टेशन गाठून दारूबंदी तसेच इतर अवैध धंदे बंद करण्यासाठी निवेदन दिले आहे.. गावातील दारू विक्री बंद न झाल्यास येथील नागरिकांनी आमरण उपोषण करणार असल्याचा निवेदनाद्वारे इशारा दिला आहे.निवेदनावर सरपंच नामदेव खरकंजे,सुमेध गंगाराम नाईक, पोलीस पाटील राहुल निंबाळकर, तंटामुक्ती अध्यक्ष विश्वनाथ जाने, दत्तात्रय डिवरे, श्रीकांत जाणे,सुरेश वाटे,अजाबराव रणित, देविदास निंबाळकर, पांडुरंग परघमोर, गंगाराम नाईक,मयुर वारे, शिवाजी जाणे, सुरेश वाटे, वैभव जाणे, विशाल निंबाळकर,यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थांच्या निवेदनावर सह्या आहेत.
