मेळघाटातील सुपीक माती वीटभट्टीधारकांच्या घशात !
राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
चिखलदरा तालुक्यातील बदनापूर, हिरदामल, रामटेक, कुलमगणा, वस्तापूर परिसरातील शेतातील माती वीटभट्टीधारक नियमाचा उल्लंघन करून उत्खनन करून या परिसरातील माती अचलपूर तालुक्यातील सावळी दातुरा या परिसरात वीटभट्टीवर नेत आहे. यामुळे मेळघाटातील सुपीक जमीन बंजर होण्याच्या मार्गावर आहे.या भागातील गोरगरीब आदिवासी बांधवांना थोड्याफार पैशाचे आमिष देऊन त्यांच्या जमिनीतील सुपीक माती हडपण्याचा प्रयत्न वीटभट्टी धारकांकडून होत आहे, याकडे प्रशासनसुद्धा दुर्लक्ष होत आहे. यामध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात देवाण-घेवाण होत असल्याचा संशय आहे. आदिवासी बांधवांच्या शेतात व ठिकठिकाणी खड्डेच खड्डे दिसून येत आहेत वीटभट्टीधारक बोपापूर, शहानूर धरणाची परमिशन घेतात व कुठूनही नाल्याच्या, रोडच्या साईडने माती खुलेआम नेत आहेत. अधिकाऱ्यांसोबत चिरीमिरी करून मेळघाटातील लोकांचे जीव धोक्यात टाकत आहे, याकडे आता तहसीलदार तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याचे गरजेचे ठरले आहे.
बुधवारी दोन ट्रकवर कारवाई..
बुधवारी सकाळी मौजे रामटेक येथील शेत स. नं. ३७ मध्ये विना परवानगी दोन ट्रक आढळून आले होते. एमएच ०४/एएल९६७५ ट्रक मालक अंकुश भाकरे रा. सावळी दातुरा व एमएच ०४/ एएल ५७१८ ट्रक मालक नरेश भाकरे या दोन्ही ट्रक मालकावर व चालकावर पोलिस प्रशासनाने व महसूल प्रशासनाने कार्यवाही केली आहे. ही कारवाई करताना पोलिस अधिकारी कराळे मॅडम, आशिष कडू मंडळ अधिकारी, यु.आर. शेगांवकर मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी गोपाल चहाटे, प्रकाश वाट, एन. जी. जामुनकर, तांडील, प्रशांत हिरे आणि वाहन चालक राऊत तसेच पोलिस पाटील कालापानी, बदनापूर हे हजर होते.
