श्रीराम नवमीच्या पावन पर्वावर मातंग समाजाच्या "बादशहा देवी संस्थान ला" भाविक भक्तांच्या सोयीसाठी भांड्यांचे वाटप...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
प्रभू श्रीराम नवमीच्या शुभपर्वावर दिनांक सहा एप्रिल रोजी सामाजिक बांधिलकी जोपासत खिरोडा येथील मातंग समाजाला खूप दिवसांपासून बादशहा देवी संस्थानला भांड्याची आवश्यकता होती. सामाजिक बांधिलकी जोपासत आज प्रभु श्रीराम नवमीच्या शुभ पर्वावर बादशहा देवी संस्थानला आवश्यक असणारे भांडे दिले.या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माधुरीताई देशमुख यांनी गरजवंतांच्या हाकेला हाक देत सर्वाना मदतीचा हात देण्यासाठी कौतुक केले. तसेच माजी सभापती यशवंतभाऊ दाणे यांनी बोलतांना सांगितले कि आज श्रीराम नवमी जयंतीच्या दिवशी दिलेला शब्द पाळण्याचं स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी सौ.माधुरीताई देशमुख, मनोहरराव बोराखडे, यशवंत दाणे, उपसरपंच हनुमानसिंग ठाकुर, गजानन ढोकणे, सरपंच रणजित गंगतिरे, मिहिर देशमुख, गजानन कडुकार, गजानन राहाटे, संतोष दाणे, रविभाऊ दाणे,दिपक निमकर्डे, अनंता धर्माळ, पंकज ठाकुर, गजानन देशमुख, संजुभाऊ ,अमर चंदनशिव, अजय चंदनशिव आदी ग्रामस्थ व महीला उपस्थित होत्या.