अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी सोपान सोळंके यांची निवड...


 
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी सोपान सोळंके यांची निवड...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची आढावा बैठक दिनांक ७ एप्रिल रोजी जळगाव जामोद येथील विश्रामगृह येथे पार पडली. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र अध्यक्ष राम चव्हाण यांच्या बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर जळगाव जामोद दौऱ्यानिमित्त ही बैठक आयोजित करण्यात आली होती यामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच आदिवासी समाज बांधव एकत्रिकरण व आदिवासी बांधवांवर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे असे मत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष राम चव्हाण यांनी व्यक्त केले. यावेळी शेषराव कोवे राज्य सहसचिव, विलास वाघमारे, नंदनीताई तर्फे राज्य महिला अध्यक्ष, संगीताताई बारेला सुखदेव डाबेराव यांनी आपापले मनोगत यावेळी व्यक्त केले. यावेळी या बैठकीला बबलू राठोड, गटविकास अधिकारी चव्हाण, विस्तार अधिकारी डाबेराव यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. या बैठकीत सर्वानुमते अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी सोपान सोळंके यांची निवड करण्यात आली. निवाना तालुका संग्रामपूर येथे पेशाने शिक्षक असणारे सोपान सोळंके महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणी आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार झाला तर तो दूर करण्यासाठी सतत कार्य करीत असतात. ग्राउंड लेव्हलचा खरा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे तसेच दरवर्षी सामाजिक मेळाव्या आयोजित करून समाजाला एकसंघ करण्याचे काम सोपान सोळंके यांनी केले. अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे सर्व परिचित व्यक्तिमत्व सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारा माणूस अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या निवडीमुळे सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या बैठकीला आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र कमिटीचे पदाधिकारी सचिन पालकर, उखर्डा सोळंके, मनीष तडवी, गजानन डाबेराव, कलीम तडवी, विलास घट्टे, अरुण चव्हाण, बाळू डाबेराव, अंजुर पवार, रेहान केदार, लालसिंग अहिऱ्या, भगतसिंग राठोड, लक्ष्मण राठोड, विनेश बारेला, बबलू राठोड, ईश्वर कुवारे यांची यावेळी उपस्थिती होती.

Previous Post Next Post