अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करत निषेध व्यक्त केला,!!
जळगाव जामोद प्रतिनिधी...
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या पक्षनेत्या स्वातीताई वाकेकर यांचे नेतृत्वात उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्या कार्यालय समोर दिनाक 17/4/2025 रोजी दुपारी 12 वाजता भाजपा सरकारचा निषेध व्यक्त करत निदर्शने आंदोलन करण्यात आले, यावेळी डॉ स्वातीताई वाकेकर यांनी देशातील लोकशाही जाऊन हुकूमशाही सरकार सत्तेच्या स्थानावर पोहचले असून जन सामन्याचे आवाज युवक शेतकऱ्यांचा प्रश्नासाठी आवाज संसदेत उठवणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी व आमच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यावर केंद्रातील मोदी सरकारने द्वेष पुर्ण भावनेने इडी चे माध्यमातून दडपशाही धोरण आणले आहे त्यावर जळगाव जामोद मतदार संघाचे वतीने निषेध करण्यात आला,तसेच देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात गांधी नेहरू परिवाराने रक्ताची व देहाची आहुती दिली आहे,देश सेवेसाठी प्प्रॉपर्टी अर्पण केली त्यांचे कुटुंबावर असे आरोप केले त्यांची खंत व्यक्त केली देशांमधे लोकांसाठी अन्यायाच्या विरुद्ध लढा उभारण्यासाठी नॅशनल हेवर्ड कंपनी ही लोकांसाठी अर्पण केली असून मनी लॉन्ड्रींग चा आरोप केला तो चुकीचा आहे त्या कारवाईचा संपर्ण देशात निषेध व्यक्त केला जात असताना मुंबई येथे महिला खासदार वर्षा गायकवाड यांचे वतीने मुंबई येथे आंदोलना दरम्यान कारवाई केली असून त्याचा सुद्धा निषेध व्यक्त करत काँग्रेस पक्षाचा विजय असो,राहुल गांधी तुम आगे बडो हम तुम्हा रे साथ है,सोनियाजी तुम आगे बडो हम तुम्हा रे साथ है,जब जब मोदी सरकार डरती है ई डी को आगे करती है,पुलिस को आगे करती है,मोदी सरकार हाय हाय,देश का झेंडा तिरंगा नहीं चलेगा दुरांगा हुकूमशाही सरकारचा निषेध असो असे नारे देत निदर्शने करण्यात आले, त्यावेळी काँग्रेस पक्षनेत्या डॉ स्वातीताई वाकेकर,अविनाश उमरकर, अर्जुन घोलप,नासिर शेख, अँड संदीप मानकर, अजहर देशमुख,अनिल इंगळे, जुनेद शेख, मिलिंद वानखडे,यांच्यासह जळगाव जामोद विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती,