श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात जपानी भाषा रोजगार संधी व भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन..


 
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात जपानी भाषा रोजगार संधी व भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन..

जळगाव जामोद प्रतिनिधी...

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात  अर्थशास्त्र, वाणिज्य आणि इंग्रजी अभ्यास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने रोजगार संधी व भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने या संदर्भात मार्गदर्शन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे सन्माननिय  प्राचार्य   डॉ. गिरीश मायी सर तर प्रमुख अतिथी मार्गदर्शक म्हणून एस.पी.एम. तात्यासाहेब महाजन महाविद्यालय चिखली येथील  डॉ. विजय वाकोडे सर डॉ. दिलीप महाजन सर हे होते. तसेच प्रा. प्रदीप चव्हाण सर  मंचावर उपस्थित होते.             डॉ.विजय वाकोडे सर यांनी जपानी भाषा शिकून रोजगार संधी कशा उपलब्ध होतात तसेच जपानमध्ये रोजगार कसा प्राप्त करून घेता येईल याविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले तर डॉ.दिलीप महाजन यांनी भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने कोणती ती कशाप्रकारे  दूर केल्या जाऊ शकतील या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे संचालन कु. ज्ञानेश्वरी बावस्कार तर प्रास्ताविक प्राध्यापक प्रदीप चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन कु. ज्ञानेश्वरी सोनवणे या विद्यार्थिनींनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. विनोद बावस्कर  प्रा.रामेश्वर सायखेडे प्रा. गणेश जोशी प्रा. सचिन उनटकार सर यांनी सहकार्य केले.

Previous Post Next Post