विद्यार्थीदशेत शिक्षणासोबत खेळ व आरोग्य याचे अनन्यसाधारण महत्व, डॉ. सौ. स्वाती किशोर केला यांचे प्रतिपादन...


 
विद्यार्थीदशेत शिक्षणासोबत खेळ व आरोग्य याचे अनन्यसाधारण महत्व, डॉ. सौ. स्वाती किशोर केला यांचे प्रतिपादन...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

चला उठा रे अभिमानाने 

             सारे मिळूनी गाऊया,

           उन्नत होऊन जगतामध्ये 

           गगन भरारी घेऊया....! 

         सहकार विद्या मंदिर दानापुर येथे दिनांक १५ एप्रिल २०२५ रोजी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय दानापूर, जळगांव जामोद, वरवट बकाल व पिंपळगाव काळेचे अध्यक्ष आदरणीय डॉ.श्री. किशोरजी केला सर यांच्या मार्गदर्शनाखाली व शाळेच्या मुख्य संयोजिका आदरणीय डॉ. सौ. स्वाती केला मॅडम, शाळेचे प्राचार्य घायल सर ,प्राचार्य लोहिया सर, बँक शाखा व्यवस्थापक सुहास जाणेजी सर, पर्यवेक्षिका कोरडे मॅडम ,गांधी मॅडम, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वखारे मॅडम यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी मुलांनी केलेले परिश्रम व त्यांचे आजच्या दिवशी होणारे कौतुक हे खरच त्यांच्यासाठी पुढील परिश्रमासाठी व यशासाठी आवश्यक ठरेल असे त्यांनी सांगितले. तसेच आदरणीय डॉ.सौ.स्वाती केला मॅडम यांनी अध्यक्षीय पद भूषवत आपल्या मार्गदर्शनातून मुलांना प्रयत्नार्थी परमेश्वर म्हणजेच-काही मुलांना आज जरी बक्षीस मिळाले नाही म्हणून आपण प्रयत्न करायचे नाहीत असा विचार न करता आपण आपली जिद्द, आपली आशा सोडायची नाही तर आपण जिद्द आणि चिकाटीने आपले प्रयत्न सतत सुरू ठेवायचे असे सांगितले. सोबतच मुलांना एका छोट्या चिमणी प्रमाणे ती जशी पिल्लांना मातीतील दाणे टिपून आपल्या मुलांचे पोट भरते तसेच आपण सुद्धा वेगवेगळ्या गोष्टीतून काही नवीन शिकावे असे सांगितले. हा संदेश खरोखरच मुलांसाठी मोलाचा आहे. सोबतच विद्यार्थी जीवनात मुलांनी शिक्षणासोबत खेळाला सुद्धा महत्व द्यावे व त्याकरिता स्वतःच्या आरोग्याकडेही तेवढेच लक्ष देणे आवश्यक आहे याचे सुद्धा मार्गदर्शन केले. वर्षभरात घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा, कार्यक्रम, प्रदर्शनी व इतर उपक्रम यामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांचा आनंद बघून उपस्थित सर्व मान्यवरांना आपले बालपण नक्कीच आठवले असेल अस म्हणण्यास हरकत नाही.सूत्रसंचालन खोडे मॅडम व वाकोडे मॅडम यांनी केले. सर्व कार्यक्रम उस्फूर्तपणे पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Previous Post Next Post