वाणिज्य व अर्थशास्त्र अभ्यास मंडळाच्या विद्यार्थ्यांनी दिली कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट...


 
वाणिज्य व अर्थशास्त्र अभ्यास मंडळाच्या विद्यार्थ्यांनी दिली कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

 कृषी उत्पन्न बाजार समिती आसलगाव बाजार केंद्राला श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाच्या वाणिज्य व अर्थशास्त्र अभ्यास मंडळाच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली यामध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती विषयी माहिती असा अभ्यासक्रम असल्याने प्रत्यक्ष बाजारपेठेचे काम कसे चालते हे पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी आसलगाव बाजार येथील मार्केटला एक दिवसीय भेट दिली यामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्षपणे बाजाराचे काम कसे चालते व्यापारी शेतकऱ्याच्या शेतमालाची कशी खरेदी करतात तसेच खरेदी संबंधी अन्य प्रक्रिया कशी चालते.मार्केटमध्ये शेतमाल आणण्यापासून विक्रीपर्यंत तसेच शेतकऱ्याच्या हातात रक्कम मिळेपर्यंत अशा सर्व विषयाची माहिती देण्यात आली यासोबतच कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्य कसे चालते.कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रसेंनजित पाटील यांनी विद्यार्थ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे वैशिष्ट्ये आज पर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीने केलेले कार्य आणि तीस वर्षाच्या कालावधीत एकही भ्रष्टाचाराचा आरोप कृषी उत्पन्न बाजार समितीवर नाही कोणत्याही शेतकऱ्यांची फसवणूक नाही असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देखील दिले तसेच या कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रशांत अवसरमोल यांनी शेतकऱ्याला वेगवेगळे पीक घेण्याची आवश्यकता आहे जेणेकरून त्याच्या पिकाला भाव मिळेल असे सांगितले. तसेच संचालक महादेव पाटील यांनी विद्यार्थ्यांना सेज बद्दल माहिती सांगितली. उल्हास माहोदे यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती ही सुरुवातीपासून अडतमुक्त आहे असे सांगितले. प्रभात पाटील यांनी धान्याच्या साठवणुकीसाठी असलेल्या वेअर हाऊस बद्दल माहिती सांगितली यावेळी आसलगाव येथील सरपंच विष्णू इंगळे तसेच कर्मचारी महादेव बाठे ,सागर निंबाळकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा आकाश निलजे आभार प्रदर्शन प्रा विनोद बावस्कर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ गिरीश मायी, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ ऋषिकेश विप्रदास, प्रा विनोद बावस्कर, प्रा डॉ गोपाल भड, प्रा रामेश्वर सायखेडे, प्रा गणेश जोशी, प्रा आकाश निलजे, प्रा सचिन उनटकाट, प्रा अर्चना जोशी, प्रा निलिमा भोपळे यांनी सहकार्य केले.

Previous Post Next Post