राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
चिखलदरा तालुक्यातील ग्रामपंचायत गौलखेडा बाजार येथे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ ला दहा वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधुन प्रथम दशवर्षी सोहळा निमित्ताने ग्रामपंचायत गौलखेडा बाजार येथील आपले सरकार सेवा केंद्राचे लोकार्पण सोहळा मेळघाटचे क्षेत्रातील आमदार केवलराम काळे यांच्या हस्ते आज दि.२८/४/२०२५ ला ठिक ११ वाजता संपन्न झाला.या कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून आमदार केवलराम काळे अध्यक्ष सरपंच रामेश्वर चिमोटे हे होते.प्रमुख अतिथी म्हणून चिखलदरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकडे हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे अमरावती जिल्हा उपाध्यक्ष अप्पा पाटील,बिजीपी चिखलदरा तालुका अध्यक्ष (दक्षिण) दिनेश चव्हाण, सरपंच सुजित भास्कर हे होते.तसेच ग्रामपंचायत गौलखेडा बाजार चे सदस्य गण विजय मावस्कर,भारती चव्हाण, सचिव सुधिर भागवत, तलाठी अल्केश महल्ले,व प्रविण येऊल, दयाराम बेलसरे, धर्मराज भास्कर व गावातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.