आ.संजय कुटे यांच्या हस्ते ग्रामपंचायत पळशी मार्फत अपंगांना कुलरचे वाटप...



 
आ.संजय कुटे यांच्या हस्ते ग्रामपंचायत पळशी मार्फत अपंगांना कुलरचे वाटप...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी ग्रामपंचायत  नेहमीच नवनवीन उपक्रम राबविण्यात तालुक्यामध्ये अग्रेसर असते, गावामध्ये शेतकरी कॅम्प, स्वच्छता, पाणी पुरवठा, गावकऱ्यांसाठी वेगवेगळे कॅम्प, शाळा अंगणवाडी, तसेच गावकऱ्यांच्या समस्येसाठी ग्रामपंचायत मार्फत नेहमीच पुढाकार घेतला जात असतो, त्यातच आज ग्रामपंचायत पळशी झाशी मार्फत अपंगांना कुलर वाटप करण्यात आले,सर्वप्रथम गावातील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रतापराव जाधव, माजी मंत्री तथा आमदार संजय कुटे, यांच्या हस्ते पार पाडण्यात आला, त्यानंतर गावाच्या सरपंच प्रियंका राहुल मेटांगे, तसेच सचिव हेमंत बापू देशमुख यांच्या संकल्पनेतून अपंगांना कुलर वाटप कार्यक्रम आमदार संजय कुटे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ माधुरी कैलास मारोडे, तर प्रमुख उपस्थिती तहसीलदार प्रशांत पाटील साहेब, गटविकास अधिकारी माधव पायघन साहेब, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मंचकावर उपस्थित होते.
त्यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल मेटांगे यांनी ग्रामपंचायतीच्या विकास कामांचा आढावा तसेच नवीन पालखी रस्ता, वाचनालय, गावातील विविध रस्ते तसेच नाल्या, संदर्भात आमदार साहेबांना माहिती देऊन काम टाकण्यासंदर्भात सांगितले. तसेच खासदार व आमदार साहेब यांनी गावात दिलेले निधीबद्दल त्यांचे आभार सुद्धा मानले, त्यानंतर प्रशांत पाटील साहेब, अभयसिंह मारोडे, राजु मुयांडे, यांनी आपले मनोगत मांडले, त्यानंतर आमदार साहेबांनी आपले विचार मांडताना गावात आणखी रस्ते व विकास कामे टाकण्यासंदर्भात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीराम बांगर यांनी केले, त्यावेळी उपसरपंच पंचफुलाबाई पवार, सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका मदतनीस, गावातील बचत गटाच्या महिला, व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
_______________________
अपंगांना  कुलर वाटप करून, मनाला खूप आनंद वाटला, तसेच  केंद्रीय मंत्री खासदार प्रतापराव जाधव साहेब तसेच माजी मंत्री तथा आमदार संजय कुटे साहेब.यांनी शब्दाला मान देऊन उपस्थित राहून गावकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे मनापासून खूप खूप आभार, 
सरपंच सौ. प्रियंका राहुल मेटांगे
ग्रामपंचायत पळशी झाशी...

Previous Post Next Post