समृद्धी महामार्गावरील अपघातग्रस्तांना मिळणार तातडीने मदत,संजीवनी क्लिनिक निरंतर सेवेचा लोकार्पण सोहळा थाटात..!


 
समृद्धी महामार्गावरील अपघातग्रस्तांना मिळणार तातडीने मदत,संजीवनी क्लिनिक निरंतर सेवेचा लोकार्पण सोहळा थाटात..!

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर वाहने अधिक गतीने धावतात.यादरम्यान कुणाचाही अपघात होऊच नये हीच आपली भावना आहे. परंतु दुर्दैवाने अपघात घडल्यास संजीवनी क्लिनिक निरंतर सेवेच्या माध्यमातून अपघातग्रस्तांना विनाविलंब तातडीने उपचार मिळणार आहेत व ही सुविधा आणि कंटेनर हॉस्पिटल राज्यात सुरुवातीलाच मेहकर इंटरचेंज वर सुरू करण्यात आले.एसबीआय संजीवनी निरंतर सेवा व क्रिएटिव्ह गृप यांच्या वतीने समृद्धी महामार्गाच्या मेहकर इंटरचेंज वर कंटेनर हॉस्पिटल ची सुविधा सुरू करण्यात आली तर फिरते रुग्णालयाची देखील सुविधा सुरू करण्यात आली असून लोकार्पण माझ्या हस्ते संपन्न झाले.संजीवनी क्लिनिक निरंतर सेवा मध्ये २४ तास उपचार सुविधा असणार आहे.अत्याधुनिक व वातानुकूलित कॅबिन, प्राथमिक उपचार, औषधोपचार असणार आहेत तर फिरत्या रुग्णालयात मेहकर इंटरचेंज पासून दोन्ही बाजूला ३० किमी पर्यन्त कुठेही तात्काळ सुविधा मिळणार असल्याने दुर्दैवाने असा काही प्रसंग उदभवल्यास ही सुविधा महत्वाची व जीवनदान देणारी ठरणार आहे. माझ्या प्रयत्नाने राज्यात प्रथमच मेहकर येथे ही सुविधा मिळाली आहे हे विशेष!यावेळी मा.आ.संजयजी रायमुलकर,एसबीआय संजीवनी निरंतर सेवा आणि क्रिएटिव्ह ग्रुपचे अध्यक्ष विक्रांत बापट,संजय प्रकाश मॅनेजिंग डायरेक्टर एसबीआय फाउंडेशन,अरबैदू मुखोपाद्याय,सिएफओ,अरविंद देव्हारे,ग्रुप हेड,मयूर ठाकरे,राजाराम चव्हाण,शुभम कुमार,निलेश देठे शिवसेना ता.प्रमुख सुरेश वाळुकर,प्रा.डॉ.सचिन जाधव,राहुल देशमुख,कैलास जाधव व प्रमुख पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

Previous Post Next Post