पिंपळगाव काळे येथील ३५ वर्षीय सलून व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या...


 
पिंपळगाव काळे येथील ३५ वर्षीय सलून व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या ग्राम पिंपळगाव काळे येथे दिनांक १९ एप्रिल रोजी एका सलून व्यवसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दुपारी ४:३० वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. सदर घटनेची तक्रार मृतकाचा भाऊ प्रवीण पांडुरंग यवतकर वय ४७ वर्ष राहणार पळशी सुपो याने जळगाव जामोद पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पीएसआय अमोल पंडित पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर ढोण यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असून मृतक शिवदास पांडुरंग यवतकर यांने आपले राहते घर पिंपळगाव काळे येथे लोखंडी अँगल ला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. भाऊ प्रवीण यवतकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. मृतक शिवदास यवतकर यांने आत्महत्या कशामुळे केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून मृतक शिवदास याचे जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालय येथे पोस्टमार्टम करण्यात आले. पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रशांत झेंडगे करीत आहेत.

Previous Post Next Post