गर्भवती महिलेच्या पोटावर ,गुप्त अंगावर ,आशा वर्कर व तिच्या पतीने केली जोरदार मारहाण...महिला गंभीर जखमी ,डोमा येथील घटना...


 
गर्भवती महिलेच्या पोटावर ,गुप्त अंगावर ,आशा वर्कर व तिच्या पतीने केली जोरदार मारहाण...महिला गंभीर जखमी ,डोमा येथील घटना...

राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

चिखलदरा पोलीस स्टेशन हद्दीत काटकुंभ पोलीस चौकी अंतर्गत , डोमा गावातील गर्भवती महिलेला येथील, आशा वर्कर व तिचा पती अमित जगलाल अथोटे रा, डोमा यांनी गावातीलच गरोदर महिलेला किरकोळ कारणा वरून पोटावर व गुप्तांगावर जोरदार मारहाण केल्याने ती गंभीररित्या जखमी झाली आहे. गर्भवती महिला रानी अजय अथोटे व पती अजय अथोटे यांना डोमा येथील आशा वर्कर त्याचा पती अमित अथोटे व त्याचा दोन्ही मुलांनी लाटया काट्यांनी विटांनी जबर मारहाण केली आहे. जखमींना जवळच्या चूरणी येथे ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. गर्भवती महिलेला रक्तस्त्राव सुरू झाल्याने गर्भपाताची दाट शक्यता वर्तवली जात आहे . मारहाणी मध्ये गर्भवती महिलेची दात सुद्धा पडले असून तिच्या पतीला विटा व लाकडी दांड्याने डोक्यावर मारहाण केल्याने मोठा रक्तस्त्राव सुरू होत आहे. सदर गर्भवती महिलेने ,,आशा वर्कर महिलेला म्हटलं ,की संडास चे पाणी हे तिच्या घरच्या नविन बांधकामा वर येत आहे , साचलेले पाणी नविन बांधकामा वर येत असल्यामुळे ते पक्क होणार नाही ,टूटन पडेल असे म्हटले असता ,आशा वर्कर ने तिच्या पतीला व त्यांच्या काही नातेवाईकांना बोलावून, अजय अथोटे यांच्या डोक्यावर विटा व लाठी काट्याने मारहाण सुरू केली ,त्या मध्ये अजय व तिची पत्नी रानी ही गंभीर जखमी झाली आहे ,दोघांना ही शासकीय ग्रामीण रुग्णालय चूर्णी येथे उपचार सुरू आहे. अजय ची पत्नी रानी याची प्रकृती चिंताजनक असल्याची समजते, घटनेची माहिती चिखलदरा पोलीस स्टेशन ठाणेदार, यांना मिळताच घटनास्थळा वरून अमित जगलाल अथोटे , संध्या अमित अथोटे ख़ुशी अमित अथोटे , चिकू अमित अथोटे यांना चौकशी साठी ताब्यात घेण्यात आले आहे .मारहान करणाऱ्या चौघांना ही ताब्यात घेण्यात आले . वृत्तलिहेपर्यंत चिखलदरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ,प्रशांत मसराम व , चौकी जमदार शंकर तायडे व पोलिस कांस्टेबल विवेक कोकरे घटनेचा तपास करत आहे .परिसरात उलट सुलट चर्चेला उत्थान येत असून शासकीय सेवेत काम करणाऱ्या आशा वर्कर ने व तिच्या पतीने नातेवाईकांनी कपडे काढून मारेपर्यंत जीवघेणा हल्ला करणे कितपत योग्य आहे अशा क्रूर प्रवृत्तीच्या लोकांवर काय कारवाई होते हे पाहणे आता गरजेचे आहे.आशा वर्कर याला सेवेतून काढण्यात यावे ही मांगनी जोर धरत आहे. या घटनेची दखल आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद अमरावती हे घेतील काय, असे प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित झाले.

Previous Post Next Post