मोहपानी येथे मुलाने केला बापाचा खुन..मूलास हिवरखेड पोलीसाकडून अटक...
प्रशांत भोपळे/हिवरखेड...
हिवरखेड पोलीस स्टेशन अतर्गत येत असलेल्या सातपुड्याच्या पायथ्याशी मोहपानी ता तेल्हारा येथील नारसींग तेरसिंग जमरा वय वर्ष 71 यांना टायगर प्रोजेक्ट मधे पुणर्वसनाचे 13 लाख रुपये मिळाले या पैशाच्या देवान घेवान वरुन मूलगा रामसिंग नारसिंग जमरा वय वर्ष 41 राहनार मोहपानी तालूका तेल्हारा जील्हा अकोला यांचे सोबत वाद होत असत अशातच आज 17/4/25 चे पहाटे 4 वाजताचे पुर्वी वडील नारसिंग तेजसिंग जमरा यांना आरोपी नामे रामसिंग यांने मृतक यास कुर्हाडी ने मारून जखमी केले व खुन केला अशी फिर्याद नामे मोहन नवलसिंग जमरा वय 26 वर्ष जात पावरा व्यवसाय शेतमजुरी रा ऊमरशेवडी तालूका तेल्हारा जिल्हा अकोला यांने दिलेल्या जबानी रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन हिवरखेड ता. तेल्हारा येथे अपराध क्रमांक 122/2025 कलम103(1) भारतीय न्याय सहीता अनन्वे दिनाक 17/4/2025 रोजी 12.47 वाजता अनन्वे गून्हा दाखल करन्यात आला आहे.सदर गून्हातील आरोपी नामे रामसिंग नारसिग जमरा वय 41 वर्ष राहनार मोहपानी ता. तेल्हारा यास मोहपानी येथुन ताब्यात घेऊन कायदेशीर रित्या अटक करन्यात आली आहे सदरची कार्यवाही माननीय जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चनसिंग अप्पर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधिकारी अनमोल मित्तल साहेब यांचे अधिपत्याखाली हिवरखेडचे ठानेदार गजाननजी राठोड, दुय्यम ठानेदार श्रिराम जाधव पोलीस उपनिरीक्षक गोपाल गिलबीले, ए एस आय महादेव नेवारे अनंता मूळे, हे काॅ जवरीलाल जाधव, हे काॅ प्रमोद भोंगळ सह आकाश गजभार यांनी सदर आरोपीस अटक करून कारवाई केल्याचे समजते .