पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना व घरकुल साठी पैसे लागत नाही-गटविकास अधिकारी संदिपकुमार मोरे..


 पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना व घरकुल साठी पैसे लागत नाही-गटविकास अधिकारी संदिपकुमार मोरे..

जळगाव जामोद प्रतिनिधी...

शासनाच्या विविध कल्याणकारी योजना पंचायत समिती स्तरावरून ग्रामीण भागात राबविण्यात येत असतात. या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना कोणतेच पैसे द्यावे लागत नाहीत. परंतु शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जळगाव जामोद तालुक्यात मोठ्या प्रमाणात दलाल सक्रिय झाले असल्याचे निदर्शनास आले असून अशा दलालांपासून लाभार्थ्यांनी सावध राहण्याचे आवाहन पंचायत समिती गट विकास अधिकारी संदीपकुमार मोरे यांनी तालुक्यातील जनतेला केले आहे. गटविकास अधिकारी संदीप कुमार मोरे यांनी दलालीच्या स्वरूपात लाभार्थ्यांना लुटण्याचे प्रकार निदर्शनास आल्यास लाच लुचपदी विभागाकडे तसेच प्रत्यक्षरीत्या गटविकास अधिकारी मोरे यांच्याकडे तक्रार करण्याचे आवाहन यावेळी केले. सध्या पंचायत समिती जळगाव जामोद अंतर्गत मोठ्या प्रमाणात घरकुल आवास योजनेची तसेच मनरेगा कामे सुरू असून बऱ्याच लाभार्थ्यांना दलांकडून घरकुल मंजुरीसाठी अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात अशी बतावणी करीत असून ज्या लाभार्थ्याकडे जागा नाही व ते गावठाण मध्ये अतिक्रमण करून राहत असतील अशांना अतिक्रमण नियमानुकुल करून देण्यासाठी सुद्धा पैसे लागत असल्याचे दलांकडून लाभार्थ्यांची दिशाभूल करण्याचे प्रकार सध्या घडत आहेत तशा प्रकारची तोंडी माहिती सुद्धा पंचायत समिती स्तरावर मिळाली असून माहितीची सत्यता आहे किंवा नाही सांगता येत नाही तरीपण पंचायत समितीकडून अभिनंदन कोणत्या योजनेसाठी मग ती घरकुल योजना असो, अतिक्रमण नियमानुकूल असो, पीडीयु असो, पशुसंवर्धन कृषी विभागाची काही कामे असो रोजगार योजना अंतर्गत कामे असो यासाठी लाभार्थ्यांना कोणासही पैसे द्यावे लागत नसून जर का असे दलाल असतील त्यांची नावे पंचायत समिती जळगाव जामोद गटविकास अधिकारी यांना कळवावे तसेच वेळप्रसंगी लाच लुचपन विभागाकडे त्याची तक्रार दाखल करून अशा दलाला धडा शिकवावा असे आवाहन गटविकास अधिकारी संदीप कुमार मोरे यांनी केले आहे...

_____________________

 __पंचायत समिती जळगाव जामोद अंतर्गत मंजूर घरकुले ९९४६ असून पूर्ण घरकुले ४६५८ झाली असून सुरू असलेली सर्व योजनाची घरकुले ४७८९ सुरू असून पंचायत समिती घराची स्थिती पाहून गृह निर्माण अभियंते त्यांचे हप्ते सोडत आहे ,परंतु अधिकारी,विस्तार अधिकारी यांना यासाठी पैसे द्यावे लागतात असे रसुलपूर येथील काही ग्रामस्थाकडून समजले असून त्यासाठी दलाल सक्रिय असल्याचे सांगत असल्याचे समजले आहे, परंतु पुरावा कोणीही दिला नाही तरी यापूर्वी सुद्धा आम्ही आवाहन करून कोणासही रक्कम देऊ नये असे आवाहन केले होते,व आजही आवाहन करत आहे कोणत्याच योजनेसाठी पैसे कोणास ही देऊ नये, तसेच सर्व लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देणे योजना राबविणे यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना वेतन मिळते त्यामुळं असे प्रकार कोणाच्याही निदर्शनास आले तर प्रत्यक्ष मला कळवावे.

संदीपकुमार मोरे

गटविकास अधिकारी पंचायत समिती जळगाव जा.

Previous Post Next Post