कर्जबाजारीपणामुळे ७२ वर्षिय शेतकऱ्यांची आत्महत्या...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम तरोडा खुर्द येथील ७२ वर्षीय शेतकरी चिंधाजी श्रीपत पवार यांनी दिनांक २६ एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजता स्व मालकीच्या शेतात विष प्राशन केल्याचे त्यांचा पुतण्या विलास पवार यास आढळुन आल्याने पुतन्या विलास पवार यांनी व काही सहकाऱ्यांच्या मदतीने लगेचच जळगांव जामोद येथे सरकारी दवाखान्यात घेऊन गेले त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करून खामगांव येथे रेफर केले होते. परंतु त्यांची तब्येत खालावत असल्याने सामान्य रुग्णालय खामगांव येथून सुद्धा अकोला येथे पाठविण्यात आले होते. त्याठिकाणी लगेचच डॉक्टारांनी पवार यांच्यावर उपचार सुरू करुन शर्तीचे प्रयत्न करुन सुद्धा रात्री २ वाजुन ३० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मावळली चिंधाजी पवार यांचे नावावर १ हेक्टर २१ आर शेती असुन सदन कास्तकार म्हणून त्यांची ओळख होती, परंतु २२ जुलै २०२३ रोजी झालेल्या महापुराच्या पुराने संपुर्ण शेती पिकांसह खरडुन गेली आणि सरकारने जाहीर केलेल्या सानुग्रह अनुदान त्यांना नियमापेक्षाहि कमी मिळाले यातच सततच्या नापिकीमुळे व सेंट्रल बँक च्या थकित कर्जामुळे, बँक कर्मचारी यांच्या तगाद्यमुळे अखेर विष प्राशन करून त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात दोन मुले,सुना व पत्नी असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या या दुखःद निधनाने तरोडा खुर्द या गाव परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे...