शेतकऱ्यांच्या कर्ज माफी करीता.महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे शोले स्टाईल आंदोलन.स्वराज्य पक्षाचे नेते गोपाल तायडे आक्रमक...
सुरज देशमुख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फंडवीस साहेब यांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन जाहीरनाम्यात दिले होते. निवडणुका होऊन तीन ते चार महिने उलटून सुद्धा अजून पर्यंत शेतकऱ्यांच कर्ज माफ केल्या गेले नाही तसेच शेतकऱ्यांचा सातबारा ही कोरा केला गेला नाही त्या उलट महारष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा म्हणतात शेतकऱ्यांच कर्ज माफी बद्दल मी बोललो होतो का. आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब म्हणतात सरकारची आर्थिक परिस्थिती व्यवस्थीत नसल्याने सरकार कर्ज माफी करू शकणार नाही.अजित दादांनी तर शेतकऱ्यांना 31 मार्चला कर्ज भरण्याचं फर्मानच काढलं होत.निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी कर्ज माफिचा मुदा घेऊन शेतकऱ्यांना कर्ज माफिच अमिष शेतकऱ्यांचे मते मिळविले.मंग शेतकऱ्यांची कर्ज माफी का करीत नाही असा सवाल महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे नेते गोपाल तायडे यांनी केला आहे. ही शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे.शेतकऱ्यांना अमिष दाखवून त्याची मते मिळविण्या अली आहेत.शेतकऱ्यांवर्ती कर्जाचा बोजा वाढत चाल्याने अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत. बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नाही.सरकार सातत्याने निर्दयीपणाने वागत आहे.शासन या सर्व प्रश्नांना न्याय देईल का. हे एक मोठं कोडच आहे.निवडणूकी च्या तोंडावर शेतकऱ्यांन करीता दिलेल्या मोठ मोठया घोषणा शेतकऱ्यांच्या मुळावर घाव घालत आहेत. शेतकरी सद्या असममानी सुलतानी संकटात असताना. शासना कडून ढोस अशी मदत मिळत नाही.त्यामुळे गोपाल तायडे यांच्या कडून शासनाचे लक्ष वेधन्या करीता आक्रमक होत.सरकार विरोधी घोषणा देत पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले.मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या तोडावर दिलेल्या कर्ज माफिच आश्वासन पूर्ण करावं अन्यथा आंदोलन तीव्र करीत शेतकऱ्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांच्या घरा समोर आंदोलन करू असा थेट ईशारा ही गोपाल तायडे यांच्या कडून देण्यात आल आहे.