४३% कर वसुली करून जळगाव जामोद नगर परिषदेने केले ६१ लाख २० हजार १०७ रूपये जमा...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
जळगाव जामोद नगरपरिषदेने यावर्षी कर मालमत्ता वसुली मोहीम जोरात सुरू केली. या वर्षी कर संकलन गेल्या वर्षीपेक्षा १७% जास्त झाले आहे जे नगर परिषदेने आतापर्यंत केलेले सर्वाधिक विक्रमी संकलन आहे. यावर्षी नगर परिषदेचे कर निर्धारण अधिकारी एस.ए. कदम यांच्या पथकाने मोठ्या उत्साहाने कर वसूल केली आहे.गेल्या वर्षी १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत १ कोटी १२ लाख ४ हजार ३५५ रुपयांच्या थकबाकी कर वसुलीपैकी केवळ ४० लाख ९ हजार २९५ रुपये वसूल झाले, जे केवळ २६.२५ टक्के वसुली होते. त्या तुलनेत, या वर्षी १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ पर्यंत १ कोटी ४२ लाख २५ हजार ५८२ रुपयांच्या थकबाकी करा पैकी ६१ लाख २० हजार १०७ रुपये वसूल झाले आहेत. जे ४३.०२ टक्के कर संकलन आहे, जे गेल्या वर्षीपेक्षा सुमारे १७ टक्के जास्त आहे.नगर परिषदेचा एकूण थकबाकी असलेला कर रु. १ कोटी ४२ लाख २५ हजार ५८२, त्यापैकी रु. ६१ लाख २० हजार १०७ रुपये वसूल झाले आहेत, जे आतापर्यंत नगर परिषदेचे सर्व रेकॉर्ड मोडणारी वसुली असल्याचे म्हटले जाते.नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सूरज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कर निर्धारण अधिकारी एस.ए. कदम यांच्या नेतृत्वाखाली कर विभागाच्या पथकाने सर्वाधिक कर वसूल करून ही कर वसुली विक्रमी केली आहे.