नव्याने जीर्णोद्धार झालेल्या मंदिरात होणार श्रीराम मुर्ती स्थापना...
अर्जुन खिरोडकर/ हिवरखेड...
हिवरखेड नजीकच्या तळेगाव बाजार येथे श्रीराम मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला असून तीन दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.दिनांक ११ एप्रिल २०२५ शुक्रवार ग्राम प्रदक्षिणा सकाळी ८.३० वाजता. पूजा आणि हवन: दुपारी ४:०० वाजता. १२ एप्रिल २०२५ शनिवार अभिषेक आणि पूर्णाहुती (मूर्ती प्राणप्रतिष्ठा) सकाळी ९.०० वाजेपासून. सुरु होणार यामध्ये भगवान श्रीराम, सीतामाताजी, लक्ष्मणजी, हनुमानजी, गणपतीजी, शिव-पार्वतीजी, नंदी, लक्ष्मी-नारायण, शीतला माता ग्राम देवता, इत्यादी देवी देवतांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा होणार आहेत. तर दि. १३ एप्रिल २०२५ रविवार रोजी महाप्रसादाचा कार्यक्रम सकाळी ११.३० पासून सुरु होईल. सर्व कार्यक्रम श्रीराम मंदिर, तळेगाव (बाजार) ता तेल्हारा जिल्हा. अकोला येथे संपन्न होतील सर्व भाविकांनी उपस्थित राहावे. असे आवाहन आयोजक जयनारायणजी रतनलालजी अग्रवाल, मुकूंद पुरूषोत्तमजी अग्रवाल, ओमप्रकाश पुरणमलजी अग्रवाल, राधेश्याम रतनलालजी अग्रवाल, घनश्याम रतनलालजी अग्रवाल, महावीर रतनलालजी अग्रवाल, आणि समस्त अग्रवाल परिवार, तळेगांव (बाजार) यांच्या वतीने करण्यात आले आहे.