महाराष्ट्राच्या सीमेवर १८ पिस्तुले जप्त. -आंतरराज्यीय तस्कराला अटक...
राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
आंतरराज्यीय अवैध हत्याराच्या तस्करीसाठी पोलिसांना वॉण्टेड असलेला उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील हातमपुराचा रहिवासी राजू जयप्रकाश (३०) याला महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या बुरहानपूर येथील पोलिसांनी अटक केल्याने एकच खळबळ माजलेली आहे.धारणी तालुक्याच्या सीमेजवळच्या पाचोरी (जि. बुरहानपूर) बनावटीच्या १८ पिस्तुली तथा १४ मॅगझिन आणि एक मोबाईलसह एकूण ३ लाख ९८ हजाराचे साहित्य मध्य प्रदेश पोलिसांनी पकडल्याने आंतरराज्यीय अवैध तस्करीचा खुलासा झालेला आहे.६ एप्रिल रोजी मध्य प्रदेशच्या बुरहानपूर जिल्ह्यातील खकनार गावाजवळच्या कुंडीयानाला फाट्याजवळ पोलिस अधीक्षक देवेंद्र पाटीदार तथा एसडीपीओ नेपानगर निर्भयसिंग अलावा यांच्या मार्गदर्शनात खकनारचे ठाणेदार अभिषेक जाधव यांनी सरळ कारवाई करुन १८ पिस्तुली व १४ मॅगझिनसह राजू वाल्मीक याला अटक केली. पोलिसांनी प्राप्त माहितीनुसार कारवाई यशस्वी केली. मेळघाट व बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूरच्या सीमेला लागूनच असलेल्या पाचोरी गावात वर्षानुवर्षापासून अवैधपणे बंदुकी, पिस्तूल, देशी कट्टे, मॅगझिन,सुरे व तलवारी बनविण्याचे अनेक कारखाने चालतात. वेळोवेळी बुरहानपूर पोलिस व जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केलेली असताना आंतरराज्यीय सिमेवरील सातपुडा पर्वताच्या मधोमध अवैध शस्त्रे बनविणे काही थांबलेले नाही. गावातील सिकलीगरांचे पूनर्वसन सुद्धा करुन शासनाने पाहले मात्र अवैध व्यवसाय सोडायला ते तयार नाहीत. ७ एप्रिल रोजी पोलिस अधीक्षक पाटीदार यांनी माहिती दिली. आरोपीने शस्त्रे पाचोरी येथून अरविंदसिंग राजपाल सिंग सिकलीगर कडून विकत घेतल्याचे बयाण दिले. पोलिसांनी अरविंदचा तपास सुरू केलेला आहे. महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या अगदी सिमेवरच अवैध शस्त्रे निर्मितीचे कारखाने पाचोरी गावात सुरू असल्याने सावध राहणे आवश्यक आहे.