"ओ आमदार काका, उसाचा रस घ्या ना!


"ओ आमदार काका, उसाचा रस घ्या ना!

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

शेगाव शहरात विविध लग्न समारंभांना आ डाॅ संजय कुटे यांनी भेटी दिल्या.उन्हाचा कडाका अंगावर येत होता, उष्णतेमुळे थोडासा थकवाही जाणवत होता. अशातच शेगावातील अग्रसेन चौकातील रसवंतीतील एका चिमुकल्याने माझ्याकडे पाहून अत्यंत निरागस हाक दिली – “ओ आमदार काका, उसाचा रस घ्या ना!”त्या लहानग्याच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि मनापासून दिलेलं प्रेमळ आमंत्रण मी कसं नाकारू शकलो असतो? क्षणाचाही विलंब न करता त्याच्यासोबत त्या रसवंतीवर गेलो. त्याच्यासोबत गारठलेल्या उसाच्या रसाचा आस्वाद घेतला.त्या रसात फक्त ऊसाचा गोडवा नव्हता, तर त्या मुलाच्या निरागसतेचा, प्रेमाचा आणि शुद्ध भावनेचा स्वाद होता. या छोट्याशा प्रसंगातून मनाला एक वेगळाच गोडवा लाभला – आयुष्यात थोडं थांबून, निस्सीम प्रेमाचा अनुभव घेण्याची आठवण देणारा!हा क्षण माझ्यासाठी एक मौल्यवान आठवण ठरला – एक निरागस मुलगा आणि त्याच्या गोड बोलांनी दिलेला उसाचा रस – खरंच अमृतासारखा होता.असे यावेळी आ डॉ.संजय कुटे यांनी म्हणाले.

Previous Post Next Post