अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची जिल्हास्तरीय बैठक उत्साहात..२ दिवसीय पत्रकारांचे राज्यस्तरिय खुले अधिवेशन ३ व ४ मे २०२५ रोजी भद्रावती येथे होणार...


 
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची जिल्हास्तरीय बैठक उत्साहात..२ दिवसीय पत्रकारांचे राज्यस्तरिय खुले अधिवेशन ३ व ४ मे २०२५ रोजी भद्रावती येथे होणार...

आर सी २४ न्युज नेटवर्क...

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची जिल्हास्तरीय बैठक ९ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता जिल्हा परिषद विश्रामगृह,मालटेकडी, अमरावती येथे अ.भा.ग्रा.पत्रकार संघाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर सुने यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलास बापू देशमुख, राष्ट्रीय कार्याध्यक्ष युसूफ खान यासीन खान,राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे,प्रदीप जोशी, राष्ट्रीय सचिव अशोक पवार,केंद्रीय संपर्क प्रमुख प्रा.रवींद्र मेंढे,महाराष्ट्र प्रदेश सल्लागार अरुण कुलथे,महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेंद्र ठाकरे,कार्यालय प्रमुख बाबाराव खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाली.कार्यक्रमाच्या सुरूवातीला अमरावती महानगर अध्यक्ष किशोर बरडे यांच्या मातोश्री स्व लिलाबाई बाबाराव बरडे,अमरावती जिल्हाध्यक्ष सुधाकर टिपरे यांच्या मातोश्री स्व.लिलाबाई टिपरे,पत्रकार अरूण कुलथे  यांच्या पत्नी स्व.अनुराधा कुलथे,अ.भा. ग्रा. पत्रकार संघाचे केंद्रीय संघटक स्व.संजय कदम व धामणगाव रेल्वे पत्रकार बोधीसत्व काळे यांचे चिरंजीव स्व.श्रध्देय काळे यांचे दु:खद निधन झाले.त्यांना संघटनेच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.अ.भा.ग्रा.पत्रकार संघाच्या वतीने यावर्षी दोन दिवसीय राज्यस्तरीय पत्रकाराचे खुले अधिवेशन ३ व ४ मे २०२५ रोजी चंद्रपूर जिल्हयातील भद्रावती येथे आयोजित करण्यात आले आहे. या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख यांनी प्रास्ताविकपर भाषणातून केले. तसेच हे अधिवेशन सर्व पत्रकारांकरीता खुले राहणार असुन महाराष्ट्र राज्यातील सर्व पत्रकार बंधू-भगिणींनी या अधिवेशनाला उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले. अमरावती जिल्हाध्यक्ष सुधाकर टिपरे व भूषण यावले, प्रा.रवींद्र मेंढे,केंद्रीय कार्याध्यक्ष युसूफ खान यांसह संघटनेच्या इतर पदाधिकारी व सदस्यांनी आपलेे मनोगत व्यक्त केले.

 यावेळी महिला मंच महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी कांचन मुरके यांची नियुक्ती...

तसेच पत्रकार संघाच्या अमरावती महानगर अध्यक्षपदी किशोर बरडे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचा सन्मान संघटनेचे अध्यक्ष मनोहर सुने व अन्य पदाधिकाऱ्यांनी केला. तसेच पत्रकार संघाचे अमरावती महानगर कार्यकारिणी,अमरावती तालुका, भातकुली तालुका, दर्यापूर तालुका,अंजनगाव सुर्जी तालुका, चांदूर रेल्वे तालुका कार्यकारिणी घोषित करून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर सुने व इतर राष्ट्रीय कार्यकारिणी चे पदाधिकारी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.तसेच जेष्ठ पत्रकार तथा केंद्रीय सचिव अशोक पवार यांचा वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.अध्यक्षीय भाषणातून पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मनोहर सुने यांनी पत्रकार संघटनेच्या कार्यप्रणालीची सविस्तर माहिती देऊन पत्रकार संघाने ग्रामीण पत्रकाराच्या समस्या शासन दरबारी मांडून त्या सोडविल्याचे सांगीतले.या बैठकीचे सूत्रसंचालन कांचन मुरके यांनी केले. तर आभार पत्रकार संघाचे कार्यालय प्रमुख बाबाराव खडसे यांनी केले.यावेळी अ.भा.ग्रा.पत्रकार संघाचे अमरावती जिल्हाध्यक्ष (पश्चिम) सुधाकर टिपरे, अमरावती जिल्हाध्यक्ष (पूर्व) भूषणभाई यावले, सुरेशसिंग मोरे, विदर्भ प्रदेश सरचिटणीस सचिन ढोके,अमरावती महानगर अमरावती तालुका,दर्यापूर तालुका अंजनगाव सुर्जी, तालुका भातकुली,तालुका चांदूर रेल्वे तालुका येथील अध्यक्ष व सर्व पदाधिकारी,सदस्य यांच्यासह अमरावती जिल्ह्यातील अनेक पत्रकारांची उपस्थिती होती.

Previous Post Next Post