गोसेवा महासंघाच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी राजेश धनुका तर जिल्हा सचिवपदी प्रा.सचिन हागे...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
गोशाळा महासंघ महाराष्ट्र,जिल्हा बुलडाणा ने भगवान महावीर जयंतीच्या शुभ दिवशी दिनांक 10.4.2025 रोजी श्री गोरक्षण संस्था घाटपुरी खामगाव,येथे गोसेवा आयोग महाराष्ट्र शासन सदस्य सुनील जी सूर्यवंशी आणि प्रमुख मार्गदर्शक ऍड जाधव, नंदूभाऊ दलाल, अशोक अग्रवाल यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये जिल्ह्यातील सर्व गोशाळा विश्वस्तांची मिटिंग संपन्न झाली त्या मध्ये बुलढाणा जिल्हा गोशाळा महासंघ कार्यकारिणी पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली यामध्ये अध्यक्ष राजेश धानुका खामगाव,सचिव प्रा.सचिन हागे जळगाव जामोद उपाध्यक्ष अशोक अग्रवाल चिखली ,उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण मेहकर, प्रसिद्धी प्रमुख दुर्गेश घरत मोताळा यांची निवड करण्यात आली.यावेळी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य उद्धव नेरकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व गोशाळा विश्वस्त उपस्थित होते.