समाजसेवक सुमित रामकिसन खंडारे राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल पुरस्काराने सन्मानित...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी-
मुबंई येथे मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी (रजि. ट्रस्ट) संस्थेच्या प्रेरणेने आयोजित राज्यस्तरीय नारीशक्ती सन्मान आणि गुणिजन गौरव महासंमेलन तसेच पुरस्कार वितरण सोहळा मुंबई शहरातील सांस्कृतिक सभागृहात थाटात संपन्न झाला. महाराष्ट्र राज्यस्तरावर विविध क्षेत्रांतून पुरस्कारासाठी निवडलेल्या ५१ मानकऱ्यांना या सोहळ्यात मानाचा फेटा, मानकरी बॅच, महावस्त्र, गौरवपदक, सन्मानचिन्ह आणि मानपत्र या स्वरूपात राज्यस्तरीय पुरस्कार थाटात प्रदान करण्यात आले. "मानवी मूल्यांचे जतन करणे हे आधुनिक जगापुढील फार मोठे आव्हान आहे! पुरस्कार मानकरी गुणिजनांनी त्यांच्या कार्याच्या सर्व क्षेत्रात मानवी मूल्य जतनाची चळवळ उभी करावी! रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या या गुणिजन संस्थेचा मला अभिमान वाटतो!" असे उद्गार समारंभाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. सुनिल सावंत यांनी अध्यक्षीय भाषण प्रसंगी काढले. सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. नंदू सावंत, सायबर सुरक्षा तज्ज्ञ सौ. सारिका जाधव, सायबर तज्ञ ,आदर्श समाजसेविका व शिक्षिका सौ. नलिनी सोमवंशी हे या पुरस्कार सोहळा संमेलनाला विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते.बुलढाणा,विविध क्षेत्रातील समाज कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, या भगव्या भव्य दिव्य पुरस्कार सोहळा वितरणामध्ये यावेळी सुमित रामकिसन खंडारे जनप्रहार कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष, S9TV जिल्हा प्रतिनिधी, दैनिक सेवाशक्ति टाईम्स, तालुका प्रतिनिधी, महाराष्ट्र न्यूज, पत्रकार तथा संचालक इन्स्पायर कोचिंग क्लासेस मेहकर यांना महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श युवा युथ आयडल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले ,या कार्यक्रमाचे आयोजक एडवोकेट जगदाळे सर, साहित्यिक सावंत सर यांनी सुमित रामकिसन खंडारे यांनी आजपर्यंत सामाजिक व पत्रकारिता मध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल दखल घेत सामाजिक कार्याची व पत्रकारी करिता यासाठी केलेले कार्य, संघटित व असंघटित कामगारांना न्यायव हक्क मिळवून देण्यासाठी जन प्रहार कामगार संघटनेच्या माध्यमातून कमी नोंद देण्यासाठी प्रयत्न करीत राहिले मेहकर मध्ये नोंदणी खूप कामगारांना दोन वेळा सुरू करण्याचे कार्य यांनी केले विविध प्रकारच्या कामगारांच्या योजनांसाठी कार्य केले तसेच इन्स्पायर कोचिंग क्लासेस च्या माध्यमातून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना अल्प दरात शिकवण्याचे कार्य केले तसेच पत्रकारितेच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा पक्षपात न करता प्रत्येक बातमीची दखल घेत असतात, हे सर्व कार्य करत असताना आपल्या मुलीच्या स्वरा सुमित खंडारे पहिला वाढदिवस पालावरील मुलांना फराळाचे वाटप करून साजरा केला दुसरा वाढदिवस अपंग मुकबधिर शाळेमध्ये जेवण देऊन साजरा केला. आणि तिसरा वाढदिवस अंध मुलांच्या शाळेत फराळाचे वाटप करून साजरा केला, या सर्व कार्याची दखल घेत, सुमित रामकिसन खंडारे यांना सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहुन राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, उपस्थित मान्यवर साहित्यिक सावंत, यांनी वर्ष १९९९ मध्ये स्थापन झालेल्या मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या गुणिजन संस्थेचा हा २५ व्या वर्षातील पुरस्कार सोहळा होता. "पुरस्कार प्रेरणा देतात; प्रेरणेने राष्ट्र मोठे होते!" या ब्रीदवाक्यावर कार्यरत ही संस्था, वर्ष २०२५ मध्ये मुंबई, पुणे आणि नाशिक येथे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळे, दिल्ली, हैदराबाद आणि चेन्नई येथे राष्ट्रस्तरीय पुरस्कार सोहळे तसेच नेपाळ, थायलंड आणि सिंगापूर येथे गुणिजन गौरव समारंभ आयोजित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे ऍड. कृष्णाजी जगदाळे यांनी समारोपात जाहीर केले.
