प्रवीण पहुरकर शंकरराव खरात राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
खामगाव प्रसिद्ध साहित्यिक तथा आंबेडकरी विचारवंत प्रवीण पहुरकर यांना त्यांच्या पेबुळ या आत्मकथनाकरिता जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ नागपूर तर्फे शंकरराव खरात राज्यस्तरीय पुरस्कार दिनांक 30 मार्च 2025 रोजी नागपूर येथील विदर्भ साहित्य संमेलन सभागृहात आयोजित भव्य कार्यक्रमात प्रदान करून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी पहूर कर यांना सन्मानपत्र व सन्मान चिन्ह डॉक्टर राजेश गायकवाड सदस्य महाराष्ट्र राज्य व संस्कृती मंडळ मुंबई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले व डॉक्टर प्रकाश करमाडकर कुलगुरू त्रिपुरा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दीपक कुमार खोब्रागडे प्राध्यापक डॉक्टर विलास तायडे डॉक्टर विद्याधर बनसोड इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.सूत्रसंचालन डॉक्टर अनिल कालबांडे यांनी प्रास्ताविक डॉक्टर भूपेश पाटील यांनी व आभार प्रदर्शन डॉक्टर विलास तायडे यांनी केले यशस्वीतेसाठी वासुदेव आले शबाना तडवी डॉक्टर किरण चव्हाण विलास विकलगुंडे सुरेश गजभिये यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील नामवंत कवी व लेखक मोठ्या संख्येने हजर होते.
