प्रशांत अवसरमोल यांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती निवड...


 
प्रशांत अवसरमोल यांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती निवड...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समितीचे रिक्त असलेल्या उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया दिनांक ९ एप्रिल २०२५ रोजी पार पडली असून या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत तुळशिराम अवसरमोल यांची अविरोध निवड झाली. सदर निवडणूक कार्यक्रम असेल तिच्या सभागृहामध्ये पार पडला असून समितीचे संचालक भास्कर पांडुरंग राऊत आणि प्रशांत तुळशीराम अवसरमोल या दोघांनाही नामनिर्देशन पत्र सादर केले होते. परंतु विहित वेळेच्या आत भास्कर पांडुरंग यांनी त्यांचे नामनिर्देशन पत्र मागे घेतल्याने प्रशांत तुळशीराम अवसरमोल यांची समितीच्या उपसभापती पदी अविरोध निवड झाली. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी एम ए कृपलानी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जळगाव जामोद यांची अभ्यासी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली होती. याप्रसंगी समितीचे सभापती प्रसेंनजीत पाटील तसेच प्रकाश अवचार, दत्तात्रय पाटील, देविदास पारस्कर, प्रमोद खोद्रे, विश्वास भालेराव, रंगराव देशमुख,अलका तायडे, वंदना आटोळे, निलेश साबे, मनोहर वाघ, भास्कर राऊत, महादेव भालतडक, उल्हास माहोदे, प्रशांत अवसरमोल, मनोज राठी,मनोरमा दैय्या, माणिक वाघ हे सर्व संचालक यावेळी उपस्थित होते.तर याप्रसंगी गजानन वाघ, सुनील बोदडे, अरूण पारवे, संतोष गवई , देवा दामोधर,ख.वि.स चे अध्यक्ष विठ्ठल वाघ, शालिग्राम रोठे, विष्णू आटोळे, शैलेश दैय्या, इरफान शेट्टी,प्रा.विजय सातव, गुलाबराव आठवले, दत्ता डिवरे यासह कर्मचारी व सर्वपक्षीय पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.नवनिर्वांचित उपाध्यक्ष प्रशांत अवसरमोल यांना पुढील वाटचालीसाठी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या..

Previous Post Next Post