मेळघाटातील चुर्णी गावात एका शेतकऱ्याची ७ जनावरे मरण पावली, सरकारकडे नुकसानभरपाईची मागणी...
राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
चिखलदरा तालुक्यातील चुर्णी गावातील शेतकरी मुन्ना बिरजू धोत्रे यांच्या ७ जनावरांचा मृत्यू झाला असून त्यात ५ गायी आणि २ बैलांचा समावेश आहे. या घटनेमुळे शेतकऱ्याचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शवविच्छेदन केल्यानंतर पशुवैद्यकीय डॉक्टर अक्षय मेश्राम यांनी सांगितले की, जनावरांना विषबाधा झाले होते.ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. मात्र, त्याचा अनुभव आणि लक्षणांवर आधारित हा अंदाज असून, संपूर्ण अहवाल आल्यानंतरच खरे कारण समजेल.शेतकरी मुन्ना बिरजू धोत्रे यांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. या घटनेमुळे त्यांचे कुटुंब बेघर झाले असून त्यांच्याकडे रोजगाराचे दुसरे साधन नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. गाईचे दूध विकून घर चालवले जायचे आणि बैलांच्या मदतीने शेती केली जायची. या घटनेची चौकशी करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. ग्रामस्थांनीही या घटनेचा निषेध करत शासनाकडे कारवाईची मागणी केली आहे.