राष्ट्रीय समाज पक्षाचे महिला आघाडी बुलडाणा जिल्हा उपाध्य्क्षपदी.सौ सरला राजेंद्र ससाणे यांची नियुक्ती...!!
जळगाव जामोद प्रतिनिधी....
पत्रकार तथा अहिल्या न्यूज चे कार्यकारी संपादिका ,आंबेडकर राईट व्हॉईस मीडिया चे संग्रामपूर तालुका सहसचिव,किसान एकता महासंघ नवी दिल्ली चे अमरावती विभागीय अध्यक्ष सौ सरला राजेंद्र ससाणे राहणार संग्रामपूर येथील रहिवाशी असून हलली मुक्काम जळगाव जामोद यांची नुकतीच राष्ट्रीय समाज पक्षाचे महिला आघाडी बुलडाणा जिल्हा उपाध्यक्ष पदी नुकतीच नियुक्ती पत्रकाद्वारे निवड करण्यात आली, राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय माजी मंत्री महाराष्ट्र राज्य तथा आमदार महादेवराव जानकर व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशिनाथ (नाना ) शेवते,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ तावसिफ शेख यांचे मार्गदर्शनाखाली बुलडाणा जिल्हा अध्यक्ष सागर संमदुर यांचे स्वाक्षरीने सौ सरला राजेंद्र ससाणे यांची नुकतीच निवड करण्यात आली असून पक्षाचे ध्येय धोरणव विचारधारा सर्वसामान्य नागरिक पर्यंत पोहचविण्याचे कार्य व्हावे करिता नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले व पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या प्रथम राजकीय पक्षांच्या पदाधिकारी म्हणून निवड झाल्या बद्दल जळगाव जा, संग्रामपूर तालुक्यासह बुलडाणा जिल्ह्यातील पक्षाचे महिला आघाडी चे पदाधिकारी व कार्यकर्ता य नियुक्ती ने नव चैतन्य निर्माण झाले असून सरला राजेंद्र ससाणे यांना अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.