दि.न्यू.ईरा कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९५.०५%


 
दि.न्यू.ईरा कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९५.०५% 

जळगाव जामोद प्रतिनिधी...

बारावीच्या परिक्षेत जळगाव जामोद शहरातील दी.न्यू. इरा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी १२ वी च्या परिक्षेत उत्कृष्ट यश संपादन केले असून महाविद्यालयाचा निकाल ९५.०५ टक्के लागला आहे. महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेत इयत्ता बारावीला १६५ विद्यार्थी प्रवेशित होते. त्यापैकी १६४ विद्यार्थी परीक्षेस बसले व त्यामधून १६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी ३ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत, ३७ पहिल्या श्रेणीत तर ९५ विद्यार्थी दुसऱ्या श्रेणीत व २८ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेचा निकाल ९९.३० टक्के आहे. तर कला शाखेत इयत्ता बारावीला ९९ विद्यार्थी परीक्षेस बसले व त्यामधून ८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेचा निकाल ८७.८७ टक्के आहे. विज्ञान शाखेमधून पल्लवी सुरेश ढगे ८३.६७ टक्के घेवून प्रथम, द्वितीय प्राची अनिल मानकर ८० तर आयेशा अनाम तृतीय ७९.५० टक्के तसेच कला शाखेमधून प्रथम जयश्री वासुदेव हिवरकर ८६.३३ टक्के, व्दितीय प्राजक्ता मधुकर तलवारे ८६.१७ टक्के व तृतीय लक्ष्मी अरुण सातव ८१.१७ क्के गुण मिळविले आहेत. जळगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल जयस्वाल, सचिव अनुप पुरानिक, प्राचार्य अविनाश कुळकर्णी, उप प्राचार्य शेख सलीम, ओंकार राव तायडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक एस. एफ. पाटील व शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.

Previous Post Next Post