युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीकांत निचळ यांचे नागरिकांना आवाहन...


 युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीकांत निचळ यांचे नागरिकांना आवाहन...

अनिल भगत/आर सी २४ न्युज नेटवर्क...

जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील समस्त नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये दिनांक ७ मे रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत निचळ यांनी आवाहन केले आहे की ज्यावेळेस आपतकालीन घटने संबंधाने सायरन वाजेल त्यावेळेस उंच बिल्डींग मध्ये राहणाऱ्या व्यक्तींनी तात्काळ खाली येवुन तळ घराचा आश्रय घ्यावा किंवा टेबलखाली अथवा ज्याठीकाणी आपल्या शरीराला ईजा होणार नाही अशा सुरक्षीत ठीकाणी संपुर्ण बॉडी फोल्ड करुन बसावे, खिडक्या, दरवाज्यामध्ये उभे राहु नये, भुकंपाचे वेळेस किंवा इतर आपतकालीन परीस्थीतीमध्ये आपण सुरक्षीत राहणेकरीता ज्या प्रमाणे उपाय योजना करतो त्याप्रमाणे उपाय कराव्यात तसेच प्राथमिक उपचाराची एक किट प्रत्येकांनी आपल्या घरामध्ये ठेवावी, कोणी फॅक्चर अथवा जखमी झाल्यास तात्काळ इतर वैदयकीय मदत मिळेपर्यंत घरगुती उपचार करावा तसेच पिण्याचे पाणी, वापराचे पाणी साठवणुक करुन ठेवावे यादरम्यान पाण्याचा वापर काळजीपुर्वक करावा तसेच रात्रीच्या वेळेस सायरन वाजल्यास तात्काळ आपले घर, दुकान या ठिकाणी असलेले सर्व लाईट बंद करावेत व विद्युत उपकरणे बंद ठेवावीत व आगीच्या ठिकाणी किंवा जखमी व्यक्ती असलेल्या ठिकाणी तात्काळ अग्निशामक दलाचे वाहन व रुग्नवाहिका पोहचणे व निघुन जाणे याकरीता सर्व सार्वजनीक रहदारीचे मार्ग मोकळे ठेवावे, जेणे करुन अग्निशामक व रुग्नवाहीका या वाहनांना अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता प्रत्येक नागरिकांनी  घ्यावी व  नागरीकांनी घाबरून न जाता प्रत्येक नागरिकांनी आपल्या सामाजिक एकतेचे दर्शन यावेळी घडवावे,आपली एकता आणी अखंडता कायम ठेवावी, आपल्या एकतेची आज देशाला गरज आहे.प्रत्येक नागरीकांने आपले आधारकार्ड, किंवा इतर कोणतेही ओळखपत्र आपले खिशात सोबत बाळगावे, कोणत्याही प्रकारची आक्षेपाहर्य बाब निर्देशनास आल्यास तात्काळी डायल ११२ वर कॉल करुन पोलीसांना कळवावे यादरम्यान नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडु नये, किंवा कोणी अफवा पसरवत असेल तर त्याची तात्काळ पोलीस स्टेशन जळगांव जामोद येथे तक्रार दयावी, सोशल मिडीयाद्वारे पसरवीण्यात येत असलेल्या अफवेला लाईक, कर्मेन्ट, किंवा शेयर करु नये, तसेच यानंतर सोशल मिडीयावरुन भारतीय सैन्याला अर्थिक मदत करण्याकरीता काही लिंक्स, स्कॅनर किंवा बैंक डिटेल्स पाठवुन फसवणुक होण्याची दाट शक्यता असल्याने कोणासही पैसे वगैरे पाठवु नका. भावनीक होवुन कोणतेही चुकीचे कृत्य करु नये, काही अडचन अथवा प्रश्न असल्यास पोलीस स्टेशन जळगांव जामोद अथवा तहसिल कार्यालयातुन अगोदर खात्री करावी. असे आवाहन जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीकांत  निचळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे समस्त नागरिकांना केले आहे.

Previous Post Next Post