महाराष्ट्र दिन व आमदार साजिद खान पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त अकोट शहरात वृक्षारोपण व सेवा कार्य
सय्यद शकिल/अकोट...
महाराष्ट्र दिन आणि अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त अकोट शहरात निजाम-ए-मुस्तफा फाउंडेशनच्यावतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष सैय्यद करामात अली मीरसाहेब यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण व रोपांचे वितरण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला व वाढत्या उन्हापासून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.या अभियानाअंतर्गत अकोट शहरातील खतीबपूरा परिसर, पोपटखेड रोड परिसरात छायादार वृक्षांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाचा हेतू फक्त पर्यावरण रक्षण नसून समाजात हरित जनजागृती निर्माण करणे हाही होता. यावेळी करामात अली मीरसाहेब म्हणाले, "वाढदिवस साजरा करण्याचा हाही एक सुंदर मार्ग असू शकतो—असे कार्य करा की ज्याचा फायदा पुढील पिढ्यांनाही होईल."त्याचबरोबर फाउंडेशनच्यावतीने दिव्यांग नागरिकांना आर्थिक मदत वितरित करण्यात आली, जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढेल व ते स्वावलंबी जीवन जगण्यासाठी प्रेरित होतील.कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मो. आदिल, मो. वसीम (मेकॅनिकल), अहमद अली, मो. शरीफ, नुसरत खाँ (ठेकेदार), इनायत अली मीरसाहेब, रहमत खाँ, मो. अजीम, मो. जर्रार, मो. मुजाहिद, रिजवान मौलाना यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी या उपक्रमाची प्रशंसा केली आणि भविष्यातही असे कार्य सुरू ठेवण्याची इच्छा व्यक्त केली.