वागडोह (शहानुर) येथील वृक्ष लागवडीत कोटी रुपयांची अफरातफर चौकशीनंतर भ्रष्टाचार समोर येण्याची पूर्ण पणे शक्यता नाकरता येत नाही...
राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
अमरावती जिल्हा अचलपुर तालुक्यातील वागडोह (शहानुर )ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या हद्दीमधील गोंडवाघोली येथील शेत शिवाराजवळील जमिनीवर कोट्यवधी खर्च करून वृक्ष लागवड करण्यात आली होती. परंतू वनविभागाच्या दुर्लक्षाने ही झाले मृत झाली आहे. त्यामुळे या वृक्ष लागवडीत कोट्यवधीचा भष्ट्राचार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकाराची चौकशी झाली,तर हा भष्ट्राचार पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही . त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी तथा उपवनसंरक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे.गोंडवाघोली येथील सर्वे नंबर १२४,१२२,१२३, १२६, १२१,११५, ११४, १२५, क्षेत्रफळ अंदाजे १५ हेक्टर जमिनीवर १६ हजार वृक्ष जगविण्याचा संकल्प प्रादेशिक वनअधिकारी यांनी सन २०२२ २०२३ मध्ये घेतला होता. यासाठी कोटी रुपयाचा खर्च दाखवून या जागी वृक्ष लागवड केली होती. या लावलेल्या वृक्षांवर वन विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे ही झाडे मृत्युमुखी पडली. या वृक्ष लागवडीमध्ये तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांने ठेकेदार व रोजगार सेवक यांच्यासोबत संगणमत करून कोटी रुपयाचा खर्च दाखवत मोठा डल्ला मारण्याची चर्चा चांगलीच आता रंगू लागली आहे. वनव्यवस्थापन समितीचे सदस्य राजलाल बाबूलाल कारले यांनी वृक्ष लागवडीमध्ये झालेल्या कोटी रुपयाच्या अफरातफरीला घेऊन अमरावती जिल्हाधिकारी व उपवनसंरक्षक (वनविभाग प्रादेशिक, अमरावती) यांच्याकडे तक्रार केली असून, त्वरित कारवाईची मागणी केली आहे. या वृक्ष लागवडीची वन विभागाने चौकशी लावली तर निश्चित स्वरूपात कोटी रुपयाचा भ्रष्टाचार समोर येण्याची पूर्ण शक्यता आहे.
________________________________
--मजुरांचे पैसे सुध्दा दिले नाही--
या वृक्ष लागवडीसाठी मजूर लावण्यात आले होते. परंतू अनेक मजुरांचे पैसे आत्तापर्यंत मिळालेले नाही. त्यामुळे या मजुरांचे पैसे गेले तरी कोणाच्या घशात ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याची सुद्धा चौकशी करणे अपेक्षीत आहे, हे विशेष.