शेतामध्ये जाण्या-येण्याचा रस्ता केला बंद.. शेतकरी आक्रमक भुमिकेत उचलले हे पाऊल...


 
शेतामध्ये जाण्या-येण्याचा रस्ता केला बंद.. शेतकरी आक्रमक भुमिकेत उचलले हे पाऊल...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

सुनगाव येथील शेकडो शेतकऱ्यांनी आज दिनांक 20 मे रोजी शेतामध्ये जाणारा रस्ता खुला करा या मागणीसाठी तहसीलदार व जळगाव जामोद पोलीस स्टेशन ठाणेदार श्रीकांत निचळ यांना निवेदन देण्यात आले आहे. सदर निवेदनामध्ये नमूद आहे की गेल्या १५ ते २० दिवसा पासून सुनगाव भाग २ मधील शेकडो शेतकऱ्यांचा रस्ता सुनगांव येथीलच शेतकरी दीपक सारबुकन व दिनेश ढगे यांनी सरकारी गाढ रस्त्यावर खोडसाळपणे नाली खोदून व काटेरी झुडपे टाकून बंद केला आता शेतकऱ्यांना पावसाळ्यात शेतीची कामे भरपूर आहेत व पावसाळ्यापूर्वी शेत नांगरून शेती पेरणी साठी तयार करणे ही कामे प्रलंबित असून रस्ता बंद असल्याने कोणतेही काम करता येत नाही त्यामुळे गावकऱ्यांनी दोघांनाही भेटून रस्ता खुला करा असे समजावण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी तो शेत रस्ता खुला करून दिला नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी व्यथित होऊन तहसीलदार जळगाव जामोद व ठाणेदार श्रीकांत निचळ यांना निवेदन देत शेत रस्ता खुला करण्याची मागणी केली आहे. तसेच शेतकऱ्यांनी येथील तलाठी वाघ यांना सुद्धा याबाबत तोंडी माहिती दिल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी निवेदन देण्यासाठी सुनगाव भाग २ चे शेतकरी प्रेमसिंह राजपूत, रामकृष्ण धुळे, सुरेश ढगे, लक्ष्मण धुळे, गजानन धुळे, गणेश धुळे, गणेश वंडाळे, श्रीराम धुळे, अनंता कपले, प्रदीप धुळे, प्रदीप आगे, गोपाल धुळे, शरद कपले, प्रशांत ताडे, समाधान भगत, श्रीकृष्ण धुळे, विजय धुळे, नारायण ताडे, बळीराम धुळे, रमेश नानग्दे, लक्ष्मण कापरे यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

Previous Post Next Post