जळगाव जामोद शहरातुन कांग्रेस ची तिरंगा यात्रा.. याप्रसंगी केला माजी सैनिकांसह वीर पत्नीचा सन्मान...


 
जळगाव जामोद शहरातुन कांग्रेस ची तिरंगा यात्रा.. याप्रसंगी केला माजी सैनिक व वीर पत्नीचा सन्मान...

मंगल काकडे /जळगाव जामोद प्रतिनिधी...

भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांचे स्मृतिदिनी ऑपरेशन सिंदूर मध्ये शौर्य गाजवणाऱ्या वीर सैनिकांच्या सन्मानार्थ आणि शहीद जवानांना अभिवादन करण्यासाठी दिनांक २१ मे २०२५ रोजी सकाळी दहा वाजता काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ याचे आदेशानुसार बुलढाणा जिल्हा कार्यवाह अध्यक्ष प्रकाशभाऊ पाटिल यांचे नेतृत्वात जळगाव जामोद येथे तिरंगा यात्रा काढण्यात आली यामध्ये शहीद सदाशिव इंगळे मार्ग येथील सदाशिव इंगळे यांच्या मार्ग फलकाचे पूजन व अभिवादन करून तिरंगा यात्रेला सुरुवात करण्यात आली. सदर यात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून पुढे तहसील चौकातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून नगरपरिषद कार्यालयातील महात्मा गांधींचे पुतळ्याचे पूजन व हार अर्पण करून चौभारा मानाजी चौक जुन्या भाजी मार्केट चावडी येथील महबूब दर्गा येथे पुष्पमाला अर्पण करीत तसेच दुर्गा चौक येथील स्वातंत्र संग्राम सैनिकांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून व चौकातील शेतकरी व बैल जोडी असलेल्या पुतळ्यातील शेतकरी बळीराजाचे पुष्पमाला अर्पण करून करून यात्रेचे रूपांतर छोट्या सभेत करण्यात आले सभेच्या ठिकाणी सर्व भारतीयांच्या भगिनी बहादूर कर्नल सोफिया कुरेशी व कर्नल योमिका सिंग यांच्या बहादूरची व उत्कृष्ट नियोजनाची आठवण करीत त्यांच्या हातून घडलेल्या शौर्याचा उलगडा करीत त्यांना व सर्व भारतीय सैनिकांचे देशवासीयां तर्फे आभार व्यक्त करीत जळगाव जामोद तालुक्यातील माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला व याप्रसंगी वीर पत्नी निर्मला सदाशिव इंगळे तसेच माजी सैनिक शरद खूपसे, दीपक चव्हाण, सोनाजी वंडाळे, देविदास सावरकर, दिलीप माणिकराव देशमुख, शंकरराव वाडे, समाधान संपतराव इंगळे, मनीष राजगुरे, अशोक श्रीनाथ, महादेव राजाराम ठाकरे, मारुती मस्के, सुभेदार आनंदा शेगोकार, बाबुराव शेगोकार, अमोल उमरकर, माजी सैनिक पत्नी रमाबाई इंगळे, राजेंद्र सदाशिव इंगळे या सर्व माजी सैनिकांचा शाल श्रीफळ व पुष्पहार घालून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व कार्यक्रमाच्या वेळी पहलगाम मध्ये शहीद झालेल्या भारतीय नागरिकांना व ऑपरेशन सिंदूर मध्ये शहीद झालेल्या सैनिकांना दोन मिनिटं मौनधारण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तिरंगा रँलीची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.याप्रसंगी प्रभारी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील ,रामविजय बुरूंगले , काँग्रेस पक्षनेत्या स्वातीताई वाकेकर , काँग्रेस तालुकाध्यक्ष अविनाश उमरकर , शहराध्यक्ष अर्जुन घोलप, मीनाताई सातव, एडवोकेट भाऊराव भालेराव , प्रमोद पाटील ,समाधान दामधर, एडवोकेट अमर पाचपोर, अझहर देशमुख ,जुबेर पटेल ,सुरेश वानखडे ,कैलास बोडखे,एडवोकेट संदीप मानकर, श्रीकृष्ण केदार, अनिल कपले ,ओ.पी तायडे, अन्सार बाबूसाहेब,किसन दामधर,बब्बू भाई,शेख जहीर अंजनाबाई उंबरकर,शेख जुनेद, नासिर भाई,सचिन जाधव, महादेव घुटे,अजय ताठे , शालिग्राम भोपळे,डॉ.शालिग्राम कपले ,अनिल पाटील, नवल मावळे, नवल गोतरकार ,सुनील काकडे, एडवोकेट रवींद्र काकडे, सलीम शहा,अमोल वसतकार, गोपाल तायडे, मयूर राऊत, बंडी कळस्कार, शेख हारुण अत्तार, योगेश जाधव, अमित जाधव, सचिन हरमकार,यांचेसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post