जळगावात भाजप कार्यकर्त्याची हत्या की आत्महत्या..?पंकज देशमुख आत्महत्या प्रकरण येणार चर्चेत..!
जळगाव जामोद प्रतिनिधी...
जळगाव जामोद मतदारसंघांचे विद्यमान आमदार माजी मंत्री डॉ संजय कुटे यांचे कट्टर समर्थक व ठेकेदारी व्यवसाय करणारे पंकज उत्तमराव देशमुख वय ३६ वर्ष राहणार शिक्षक काँलनी जळगाव जामोद हे दिनांक ३ मे रोजी संध्याकाळच्या सुमारास बऱ्हाणपूर रोडवरील त्यांच्या शेतातील बदामच्या झाडाच्या फांदीला रुमालच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आल्याने जळगाव जामोद परिसरात एकच खळबळ उडालेली होती.तर नागरिकांच्या चर्चेत पंकज देशमुख यांची हत्या झाली असल्याची चर्चा जोर धरत आहे.सदर घटनेची तक्रार अनंता मधुकरराव देशमुख यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिल्याने घटनास्थळी जाऊन पंचनामा करून पंकज देशमुख यांचे शव काढून ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले होते.यावेळी डॉक्टर शवविच्छेदन करण्यासाठी गेले यावेळी नातेवाईकांनी पंकज देशमुखांच्या आत्महत्ये बद्दल शंका उपस्थित करून शंकेचे निरसन करण्यासाठी अकोला येथील मेडिकल कॉलेजमध्ये त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.तर या अगोदर पंकज देशमुख यांच्यावर मोठे कर्ज झाले होते परंतु आता सर्व काही सुरळीत चालू असताना त्यांना हे टोकाचे पाऊल का बरे उचलावे लागते हा मोठा प्रश्न असुन पंकज देशमुख यांच्या अंगावर जखमेच्या खुणा असुन त्यांची हत्या की आत्महत्या असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये सुरू आहे.पीएम रिपोर्ट आल्यानंतर पंकज देशमुख यांची हत्या की आत्महत्या हे सत्य समोर येणार आहे.घटनेचा पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात पीएसआय अमोल पंडित व पो.काँ.परमेश्वर ढोण करीत आहे.
