शेगाव डेपोच्या महिला वाहकाचा प्रामाणिकपणा बसमध्ये राहलेले २ लाखाचे दागिने केले प्रवाशी महिलेला परत...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
शेगाव येथील आगारात कार्यरत असलेल्या सौ. आरती केनेकर या महिला वाहकाने प्रवासी महिलेचे बसमध्ये राहिलेले दोन लाखाचे दागिने परत करून प्रामाणिक पणाचा प्रत्यय दिला आहे. प्रामाणिकपणा कुठेही पाहायला मिळत नाही. प्रत्येक व्यक्ती स्वार्थ साधत असल्याचे दिसते. परंतु आजही स्वार्था पलीकडे जावून त्याग, सेवा, समर्पण भूमिका असलेले लोक दिसुन येतात. त्याचा उत्तम प्रत्यय दिला तो शेगाव डेपोत काम करणाऱ्या एका महिला वाहकाने. चक्क २ लाखाचे दागिणे परत देऊन माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून दिले आहे. शेगाव-तेल्हारा बस क्रमांक ९९६३ या बसमध्ये गौरी श्रीकांत जोशी रा. जळगाव खांदेश ही प्रवासी महिला तेल्हारा एस टी डेपोमध्ये उतरली आणि बस पुन्हा शेगाव कडे जाण्यास निघाली . त्यानंतर सदर प्रवासी महिलेच्या लक्षात आले की, आपले दागिने बसमध्येच राहिले. त्यामुळे तिने तेल्हारा आगर मध्ये जावून बसमध्ये दागिने राहिल्याचे सांगीतले. त्यावर नियंत्रकाने शेगाव येथे संतोष दिवनाले यांच्याशी संपर्क साधला असता दिवनाले यांनी सदर वाहक महिलेला मोबाईलवर संपर्क साधून बसमध्ये प्रवासी महिलेचे दागिने राहले असल्याची माहिती सांगितली . आणि बसमधील महिला वाहक सौ. आरती केनेकर यांनी सिटवर जावून पाहले असता त्या ठिकाणी दागिणे दिसून आले. तेव्हा तुमचे दागिने बसमध्येच आहेत . असे सांगून सदर महिला प्रवाशाला शेगाव येथे बोलावून एस टी मध्ये दागिने महिला प्रवाशाकडे सुपूर्त करण्यात आले. त्यामुळे महिला वाहकाचा प्रामाणिकपणा दिसून आला. अशा ह्या विश्वासु प्रामाणिकपणा बद्दल महिला वाहक सौ. आरती केनेकर यांचे कौतुक करण्यात येत आहे.
