शासनाच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा,आ.प्रकाश भारसाकळे...कृउबास सभागृहात आ.भारसाकळे यांचा सत्कार..


शासनाच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा,आ.प्रकाश  भारसाकळे...कृउबास सभागृहात आ.भारसाकळे यांचा सत्कार..

सय्यद शकिल/अकोट तालुका प्रतिनिधी...

शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध शासकीय योजना महत्वाच्या असून शेतकऱ्यांना न्याय  मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन आ.प्रकाश भारसाकळे यांनी केले.शासकीय ज्वारी खरेदीच्या निमित्ताने आ.प्रकाश भारसाकळे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला सदिच्छा भेट दिली असता स्थानिक सहकारी संस्थांच्या विद्यमाने आमदार भारसाकळे यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.अध्यक्षस्थानी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक नानासाहेब हिंगणकर उपस्थित होते.उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर, तहसिलदार सुनील चव्हाण,कृउबासचे सभापती प्रशांत पाचडे व संचालक तालुका खरेदी विक्री संस्थेचे उपसभापती शेषराव पा. वसू व संचालक, सहकारी जिनिंगचे उपाध्यक्ष रामदास थारकर व संचालक  तथा सहकारी संस्थांचे संचालक व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेतक-यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी विपणन व्यवस्था व सर्व सुविधांसाठी अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन आ.भारसाकळे यांनी  दिले.तर नानासाहेब हिंगणकर यांनी शेतक-याचे हितसंवर्धन विशेषतः शेतक-यांना हमी दर मिळावा यासाठी शासनाचे शेतमाल खरेदीसाठी स्थानिक सहकारी संस्था सदैव तत्पर असल्याची ग्वाही दिली.कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन कृउबासचे संचालक शंकरराव लोखंडे यांनी केले.यावेळी कृउबासचे माजी सभापती शंकरराव चौधरी,भाजपचे नेते डॉ राजेश नागमते, गजाननराव गावंडे, आदीसह सहकार कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post